शनिवार, 15 जून 2013

विसंगती : बुद्ध वचन आणि पाली त्रिपिटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हटल्या गेले आहेत ते स्विकारतांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे......जी गोष्ट तर्कसंगत आहे, ते बुद्धवचन होय.” (बुद्द आणि त्यांचा धम्म, खंड चवथा) विज्ञान म्हणजे तर्कसंगत विचार. गुढ ज्ञान म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे कार्यकारणभावाचा अभाव. कारणाशिवाय कार्य असंभव आहे. कारण नसेल तर कार्य घडूच शकत नाही. कार्य हे नेहमी कारणांच्या सामुहिक प्रयत्नातूनच उद्भवतात. कोणत्याही एका कारणाने कार्य घडत नाही. कार्य-कारण हे अनित्य, परिवर्तनशील वैज्ञानिक विचारधारा आहे. ईश्वर व आत्मा असल्याची का करणे तर्कसंगत नाहीत म्हणून ते अज्ञान या व्याख्येत मोडतात. 

स्वार्थी लोकांनी अज्ञानाला सोबत घेवून सामान्य लोकांची हजारो वर्षांपासून दिशाभूल, लुबाडणूक केली. त्यातून वाचायचे असेल तर विज्ञानाचा आधार घेणे फार गरजेचे आहे. विज्ञान हे केवळ प्रायोगिकच असते असे नाही तर ते प्रगतीकारक वैज्ञानिक दृष्टीकोन दर्शक हा आहे. त्यातून मानवी जीवनासाठी आशावाद उभा राहतो. विज्ञान म्हणजे कल्याणकारी आशा होय. ती निराशेपासून व्यक्तीला, समाजाला देशाला, जगाला वाचवीत असते. ती जीवनाला सुखकर बनवते व दु:खात मदतीला येते. विज्ञान हे केवळ भौतिक असते असे नव्हे तर ते मानसिक सुद्धा असते. आदरणीय महामानव बुद्ध हे जगातील सर्वात मोठे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. त्यांनी मनाचे शास्त्र उलगडले होते. मन आणि त्याचे व्यापार त्यांनी ओळखून त्यापासून आपली वर्तणूक कशी करावी म्हणजे नुकसान होणार नाही, याचे पदोपदी त्यांनी आयुष्यभर प्रबोधन केले. ते तथ्यातून सत्य शोधणारे असल्यामुळे तथागत म्हणून प्रसिद्ध पावले.

बुद्धधम्माच्या नावावर कोणत्या अज्ञानाचा बौद्ध भिक्षूंनी प्रचार-प्रसार केला व त्याचे समाज जीववनावर कोणकोणते बरे-वाईट परिणाम झाले? ते तपासणे धम्म प्रचाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर महायानी भिक्षुरचित त्रिपिटकाचा फार प्रभाव होता. त्यातून त्यांची भाषणे आणि वाङमय उदयास आले. त्याचा समाजावर कसा परिणाम झाला. सध्या पंचशील या विचाराचे संशोधन करणे फार गरजेचे आहे. अलीकडे भिक्षूंच्या माध्यमातून उपासकांना “पंचशील म्हणजे धम्म” अशी शिकवण दिली जात आहे. जर उपासक पंचशिलेचे पालन करीत नसेल तर तो धम्माचे पालन करीत नाही अशी अफवा भिक्षु लोक करीत आहेत. पंचशील हे महायानी संप्रदायातील भिक्षूंची देन आहे. त्रीपिटकातील खुद्दक निकायातील “खुद्दक पिटकात” त्याचा उल्लेख आहे. आता प्रश्न हा येतो कि, बुद्धाने त्रिपिटक लिहिले का? त्रिपिटक म्हणजे भिक्षूंनी वेळोवेळी तयार केलेल्या पुस्तकांचे तीन पेठारे होत. ह्या तील सर्वच विचार प्रामाणिक आणि बुद्धिवादी दृष्टीनेच लिहिले आहेत ते कशावरून समजावे?

पंचशील ज्या निकायात आले आहे ते निकाय पाचवे आहे. प्रथम चार निकाय जुने मानले जातात आणि हे पाचवे निकाय नंतरचे आहे. महायान म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हिंदुधर्माची झेरॉक्स आहे. त्यातून निघालेले तंत्रज्ञान, मन्त्रयान हे काय बुद्धधम्म सांगतात? बुद्ध म्हणतात, “जो धम्म दर्शन करतो तो माझे दर्शन करतो.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृष्ठ- ३३६, सम्यक प्रकाशन, नागपूर) तेव्हा त्रिशरण कशाला हवे? बुद्धा प्रमाणेच भिक्षुंना मान हवा म्हणून त्यांनी याला महत्व दिले पण धम्म न समजावता अभिवादन आणि मान कशाला हवा? पाचव्या निकायात धम्म तत्वज्ञान नसून महायानी (हिंदू) भिक्षूंची हुकुमशाही नियम आहेत. धम्माचे “आर्य अष्टांगिक मार्ग” हे प्रायोगिक तत्वज्ञान आहे, नियम नाहीत. 

पंचशील हे तत्वज्ञान नाही तर नियम आहेत. हे नियम एवढे ताठर आहेत कि ते सर्व परिस्थितीत पाळले जाऊ शकत नाही, म्हणूनच जर्मनीच्या ‘बुद्धजन उपासक समिती’ने पंचशिलापैकी पहिले शील सोडून उर्वरित “चारच शील” पाळण्यात त्यांनी तयारी दाखविली होती. जे नियम लोकांकडून सहज पाळले जाणार नसतील ते नियम बुद्धाची शिकवण कशी असू शकते? जे विचार बुद्धाने आपल्या पहिल्या धम्मचक्रप्रवर्तन प्रवचनात दिले त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे पंचशील का? महायानच्या कठोर नियमांमुळे बुद्धधम्म आचरणात आणण्यास कठीण झाला. जो धम्म बोलल्या जातो पण आचरणात आणल्या जाऊ शकत नाही, असा कठोर विचार बुद्धाने लोकांना दिला होता का?

पंचशिलाचे पाच नियम म्हणजे १. प्राणीहत्या करणार नाही. २. चोरी करणार नाही. ३. खोटे बोलणार नाही, ४. कामवासनेच्या ईच्छे पासून दूर राहीन, ५. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहीन. (बुद्धाने एका राजाच्या कथेतून संपत्ती नाशाचे कारणे सांगितली ती म्हणजे रंडीबाजी, दारू, जुगार, कुसंगती तथा यज्ञ) बुद्धाच्या धम्मात संपत्तीला क्षुल्लक महत्व आहे तर बुद्धीला अफाट महत्व आहे. क्षुल्लक संपत्ती रक्षणासाठी बुद्धाने पंचशीलेला धम्म बनवले असेल का? बुद्ध धम्माचे विचार केवळ संपत्ती रक्षण करणारे टोकाचे विचार सांगण्यासाठी आहे कि, सर्वांगीण सुखाचा सम्यक मार्ग दाखवण्यासाठी आहेत? पंचशील व्यवहारिक आहेत का? प्राणीहत्या, चोरी, कामवासना, खोटे बोलणे व न नशेली पदार्थांशी मनापासून वैर करीन, अशी प्रतिज्ञा करण्याची गरज आहे का? 

देवाच्या सामने अशा प्रतिज्ञा केल्या जातात. देव त्या ऐकतो व आपणास माफ करतो. मात्र ज्या धम्मात देवच नाही किंवा जो लोक ईश्वर मानत नाही त्यांनी ह्या प्रतिज्ञा का म्हणायच्या? पंचशील म्हणणारे लोक खरोखर पाच शीलाचे, नियमांचे पालन करीत आहेत का? या देशासाठी एक व दुसऱ्या देशासाठी दुसरा असे पंचशील बुद्धाला द्यायचे होते का? अदृश्य, सुक्ष्मप्राण्यांची व्यक्ती प्रेम करतो का? दही भात खाताना दहीतील सूक्ष्म प्राण्यांना पोटात मारले जाते, जमिनीवरून असंख्य सूक्ष्मजीव पायाखाली येतात आणि मरतात. हिंसा ही फक्त प्राण्यांचीच होते असे नाही तर वनस्पतींचीही हिंसा होते. व्यक्ती सर्वच दृश्य अदृश्य प्राण्यांशी मैत्री करू शकते का? जर तो मैत्री करू शकत नसेल तर त्यांनी खोटी प्रतिज्ञा का घ्यावी?

चोरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेणारे लोक स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसायातील नियम अधिक नफ्याचे वापरून ग्राहकांची फसवणूक करतात कि नाही? दुकानदाराला कमी दरात वस्तू विकत मागतांना दुकानदार म्हणतो ‘मला अधिक नफा नाही, थोडासाच आहे’ पण ती वस्तू केवढ्यात विकत आणली? त्याचा तो निश्चित आकडा सांगताना दुकानदार खरेच बोलतो का? खोटे बोलून ग्राहकांच्या खिशातील पैशाची चोरी व्यक्ती करतो कि नाही? बुद्धाच्या काळी व्यापार होत नव्हता का? व्यापारातून चोर वाटेने नफा कसा केला जातो? हे बुद्धाला माहित नव्हते का? मी चोरी करणार नाही म्हणजे सत्य सांगून नफा कमावेन, अशी प्रतिज्ञा करणारा वैश्य बौद्ध नव्हता का? मी काम वासनेतील खोटे आचार करणार नाही. यातील वासना ही बुद्ध धम्मात काया, वाचा आणि मनाची असते. बौद्ध लोक किती प्रमाणात कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त आहेत? हा एक संशोधनाचा विषय आहे. 

खोटे बोलणार नाही, याचा अर्थ खरेच बोलणार व्यापारी ग्राहकां सोबत खरेच बोलतो का? विदेशी चोरांना खरे बोलून रस्ता सांगायचा का? आपल्या आईने आपणास कसे निर्माण केले? ह्याचे आई-वडील मुलाला खरेच उत्तर देतात का? मी नशा करणार नाही, या नियमाचा विचार केला तर अति भोजन केल्यानेही नशा येतो तर भोजन घेवू नये का? आप्रेशन करण्याआधी डॉक्टर रोग्याला नशेचे इंजेक्शन, लस देतात, ती घेणे म्हणजे नशा करणे झालेच कि नाही? पंचशील हे आचरणाचे अव्यवहारिक नियम आहेत. जगातील कोणताही व्यक्तीकडून त्याचे पालन करणे असंभव आहे, हे सामान्य ज्ञान बुद्धाला कळत नव्हते, असे म्हणायचे का? जे नियम गृहस्थ पाळू शकत नाही हे लक्षात असतानाही त्याचे पालन करण्याकरिता बुद्धाने धम्मदीक्षा, संघदीक्षा दिल्या होत्या का? बुद्धाच्या काळी पंचशील म्हणजे पाच सुविचार होते. बुद्धाच्या आधीपासूनच ते प्रचलित होते. त्याला बुद्धाचा शोध म्हणायचे का? 

बुद्धा आधीच जैन मुनींनी त्याचा “पाच बल” (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) म्हणून प्रचार केला. ती बुद्धाची शिकवण कशी? बुद्धाने दिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गा पेक्षा पंचशिलेचा मार्ग महान आहे का? कसा विचार करावा? कसा निर्धार करावा? कसे बोलावे? कसे करावे? कसे आचरण करावे? कशी सवय लावावी? कसे लक्षात ठेवावे? व कशाप्रकारे मन लावून कार्य करावे? याबाबद जे विचार सम्यक म्हणजे मध्यम, उचित, प्रसंगानुसार परिवर्तन करण्याचे स्वातंत्र्य देणारे मानायचे कि, “असे करू नका व असेच करा” ही टोके सांगणारा पंचशीलेचा मार्ग मोठा समजायचा? पंचशीलेतील नियम महायानी, हिंदू विचारांच्या भिक्षूंनी बुद्ध धम्मातील चांगले विचार लपवून ठेवण्यासाठी, चांगल्या विचाराला सह, बगल देण्यासाठी, तार्किक विचाराऐवजी तर्क विसंगत विचारांचा प्रसार करून लोकांना मूळ धम्म विचारांपासून दूर नेण्यासाठी धम्मात घातल्या गेलीत. बुद्धाने सारनाथ येथे प्रथम धम्मचक्रप्रवर्तन प्रवचन समयी सुद्धा “आर्य अष्टांगिक मार्गा”लाच सुखाचा मार्ग म्हटले आणि शेवटीस मृत्युपूर्वी कुशिनारा येथे सुभद्र भिक्षुस “आर्य अष्टांगिक मार्ग”लाच कल्याण मार्ग म्हणजे धम्म म्हटले आहे. 

ज्या वेळी बुद्ध हे धम्मप्रचार करीत होते तेव्हा सुद्धा त्यांनी उपासकांना "पंचशील" पालन करण्यावर जोर दिला होता का? पंचशील म्हणजे जैनांची पाच बले आहेत. हिंदू धर्माच्या यज्ञ संस्कृतीला पर्याय म्हणून त्यांची उत्पत्ती झाली. “अहिंसा परमो धर्म” हा विचार धम्म शिकवण आहे का? “पाणातिपाता वेरमणी सिख्खापदं समादियामी” म्हणजे प्राणी मात्राच्या हत्येपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो, हा विचार यज्ञातील हिंसेचा प्रतिरोधक आहे. यज्ञात प्राण्यांची हिंसा केली जात होती, पशु हे जनतेचे धन समजले जात होते. संपत्तीची हानी करण्यापासून वाचविण्यासाठी पंचशिलावर बुद्धाचे प्रवचन आहे. या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी “विनय पिटका”त त्यांचा उल्लेख आहे. भिक्षु हे संन्यासी असल्याने त्याचे पालन करू ही शकतील पण, भिक्षूंनी आपले नियम जेव्हा गृहस्थावर लादले तेव्हापासून धम्मप्रचार खुंटला व अधम्म हिंदू महायानी प्रचार अर्थात (धर्म प्रचार) सुरु झाला. नियम म्हणजे धम्म सूत्र (तत्व) नाहीत.

विनय पिटक म्हणजे धम्म नाही, ते भिक्षूंचे नियम आहेत. जे नियम बुद्धाने भिक्षुंना शिकवले, पालन करण्यास सांगितले तेच नियम भिक्षूंनी गृहस्थांवर थोपवले. हा प्रकार राजा सम्राट अशोकाच्या आधीपासून झालेला आहे. म्हणून अशोकांनी पंचशिलेला जगात प्रचारित केले. संपूर्ण जगात असा प्रचार झाला आहे कि पंचशील ही बुद्धधम्माची शिकवण आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यातून सुटू शकले नाहीत. भिक्षूंनी जे लिहिले ते स्वयं खरे, हा गैरसमज आहे. संतानी जे लिहिले व बोलले त्या सर्वाला कल्याणकारी विचार म्हटलेच पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचे आहे. अनेक संत व भिक्षु वैज्ञानिक दृष्टीकोन जाणत नाही, त्यामुळे ते संशोधक होऊ शकले नाहीत. वैज्ञानिक विचारांवर आधारित भिक्षूंचे साहित्य आहे कि नाही हे तपासणे गरजेचे आहे. धम्म म्हणजे विनय नियम वा पंचशील कसे?

नागपूरची धम्मक्रांति आणि आर्थिक चळवळ

हामानव बुद्धाने संवादातून धम्म समजावला. धम्मप्रचारासाठी संवाद आवश्यक आहे. समजावण्याची दुहेरी पद्धत उचित आहे. भाषण आणि प्रवचन या आधारे धम्म विचार थोपले जातात. समजल्याची खात्री झाल्यावर लोक ते चांगले आहे, ठीक आहे, समजले, फार सुंदर अशी टिप्पणी करून जायचे. आता भिक्षु प्रवचन देतात. ते अनेकांना समजत नाही. न समजल्याची तक्रार करण्यासाठी भिक्षु जागाच ठेवत नाही. भिक्षूला गुरु समजावे. त्यांनी काही न समजणारे विचार सांगितले तरी ते शिष्याने मुकाट्याने पाळावे, हा कसला धम्म प्रचार? यातूनच भिक्षु-भिक्षूंनी “सत्यनारायण कथा” अर्थात “परित्राणसूत्र पाठा”च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला कात्री लावत आहेत. बाबासाहेबांनी बुद्धधम्माचे बीज पेरण्यासाठी आजन्म शेती तयार केली. त्यात आता महायानी भिक्षु हिंदू धर्माचे पिक घेत आहेत. आज शेतीचे त्या शेतीचे रखवाल कोणी आहे का? आधुनिक विज्ञानावर आधारित धम्म वा धम्माला वैज्ञानिक आधारावर प्रचारित करण्याचा प्रयत्न किती भिक्षु करतात? अंगाववर चिवर पांघरून विश्वाची पुनर्रचना करण्याचा आव आणणे भिक्षूंनी सोडायला हवे, नाहीतर तसे करून तरी दाखवायला हवे.

समाजाने व्यक्तीला शरण जायचे कि विचारांना? व्यक्ती म्हणजे उद्दिष्ट नाही. व्यक्तींचे हित हे उद्दिष्ट आहे. व्यक्तींचा समाज होतो, समाज कल्याण कि व्यक्ती कल्याण? समाज कल्याण म्हणजे जाती कल्याण असा अर्थ घेवू नये. समाज जातीतीत आहे. अनेक समाजांचा देश व अनेक देशांचे विश्व मानले तर विश्वाची पुनर्रचना करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठले जाईल. व्यक्ती कल्याणातून हजारो वर्षापासून जगात भिक्षु आहेत आणि आतंकवादी, नक्षलवादी, भ्रष्टाचारी जगातील मानवी सुखाचा अंत करू पाहत आहेत. यात भिक्षुंचा प्रभाव मोठा आहे कि गृहस्थांचा? बहुजन म्हणजे समाज भिक्षूंनी समाजाला योग्य, उचित, समुचित, श्रेष्ठ, आदर्श, सम्यक, ‘बहुजन-हिताय, बहुजन-सुखाय’ संदेश दिला असता तर धम्मराज्य निर्माण झाले नसते का? भिक्षु हे जर गांधीसारखे टाटा-बिर्लांच्या ताटाखालचे मांजर बनले असतील तर काय फायदा?

बुद्ध कि कार्ल मार्क्स? यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला धम्म हि अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे कि कार्ल मार्क्स च्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांचा मताप्रमाणे “धर्म” म्हणजे काहीच नाही ज्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले. निवांत झोप मिळाली कि सगळ संपल. हे त्यांच तत्वज्ञान! मी त्या मताचा नाही, माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख-समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही. 

“आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच. पण मी यात एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोजू वैरण लागते. मानसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे कि रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही, असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्यात मला काहीच कारण नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातींचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही..... बुद्धाने सांगितले, जगात ९०% व्यक्ती दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसाना मुक्त करणे हे बौद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा वेगळे असे कार्ल मार्क्स यांनी वेगळे असे काय सांगितले?” (नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भाषण, दिनांक- १५ आक्टोंबर १९५६)

धर्मांतराच्या चळवळीतून नागपूरला धम्मदीक्षा नागपूरला घडली. यात ५ लाख गरीब, उपाशी उद्या पोटभर मिळेलच या आशेने लोकांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी ते भुकेले राहू नये म्हणून जे प्रयत्न केले त्यातून फक्त १० % लोकांची पोटे भरली. उर्वरित ९०% लोक उपासीच आहेत. त्यांच्या पोटाला अन्न नसेल तर त्यांना बुद्धीची हालचाल कळेल का? बुद्धाने म्हटले, प्रथम उपाशी लोकांना ज्ञान नाही तर अन्न द्यावे. त्याला नंतर धम्म सांगावा. आता आपण कितीही भुकेल्या भारताला धम्म दिला तरी समजेल का? याचा सुज्ञ बौद्धांनी विचार करून धम्म प्रचाराला लागावे. तरच धम्माचा योग्य तो प्रभाव लोकांवर पडेल. बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक लोकशाहीला किती काळ थोपवून धम्म प्रचाराचा गाढा समोर ओढता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे. 

भुकेले लोग बौद्ध धम्म सोडून दुसरीकडे का भटकत आहेत? पोटासाठी कि उपशीपोठी धम्म न समजल्यामुळे? समाजाचे सर्व प्रश्न विचारात धम्म घेत होता पण आता त्याला फक्त संस्कृतीत बहिष्कृत करून कसे चालेल? धम्माला अर्थ, शिक्षण, सत्ता, आणि संस्कृती हे चारही प्रश्न सोडवत चालावे लागेल तरच सर्वांगीण समाज परिवर्तनाची गरज पूर्ण होईल. आज फक्त भरलेल्या ढेरपोट्या लोकांसाठीच धम्म ठरत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आजचे आंबेडकरी बौद्ध धम्माला फक्त पोट भरलेल्या, चैन करणाऱ्या लोकांसाठी मर्यादित करीत आहेत आणि उपाशी लोकांकडून धम्म आचरणाची अपेक्षा करतात, हे कसे शक्य आहे? आधी धर्मांतर कि आर्थिक समस्या? त्यापैकी धर्मांतर झाले पण आर्थिक समस्या सुटली नाही. जातिगत आरक्षणाने सुटणारच अशी कोणीही शाश्वती पण देवू शकणार नाही. त्यामुळे धम्म घातकी उलट जातिवाद वाढेल.

घटना : ईश्वरीय कृति कि कार्यकारण सिद्धांत?


बौद्ध, धम्मधारी लोक नेहमीच, सततच गरिबीत राहिले तर ते केव्हाही मार्क्सच्या साम्यवादाचे सैनिक बनून, बुद्ध धम्माला “अफू” समजून संपुष्टात आणतील. तसे प्रयत्न नक्षलवादी लोकांकडून चालू आहेत. 'नक्षलवाद' भारतात का आला? तर त्याची कारणे धम्म समजावून सांगण्यास बौद्ध लोक मागे पडलेत, हि आहेत. ‘’चैन” आणि “गरिबी” बुद्धाला व बाबासाहेबांना नको होती पण बौद्ध त्याला बळी पडले. बौद्धांच्या आचरणातूनच धम्म दिसायला पाहिजे पण तो दिसतो का? जर हजारो वर्षापासून चालत आलेली भिक्षूंच्या “महायानी” हिंदू, अवैज्ञानिक विचानाची भेसळ नष्ट झाली नाही तर नक्षलवादी लोकांना कोणता शुद्ध धम्म विचार द्यायला हवा? बाबासाहेब सामान्य लोकांना नियम आणि असामान्य लोकांना तत्वज्ञान सांगू ईच्छित होते. म्हणून त्यांनी विहारासोबत वाचनालय असावे असा विचार मांडला पण किती विहारात तो वास्तवात उतरला? विहारे बनलीत पण त्यात वाचनालये नाहीत पुजापाठेचा धम्म नव्हे तर धर्म फोफावला.


बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या बाजू ने उभे दिसतात. त्यांच्या मते बुद्धाचा धम्म मार्क्सच्या हमल्या पासून दूर आहे. मार्क्सच्या हमला वैश्य रुपी व्यापाऱ्यांवर आणि ब्राम्हणी पुरोहीतशाहीच्या धर्मावर आहे. व्यापारातील साधने ही सार्वजनिक असावित पण भारतात तसे नाही आणि धर्म हा अवैज्ञानिक विचारांवर आधारित आहे. बुद्धाचा धम्म हा धर्म नाही कारण त्यात आत्मा, ईश्वर, यांना स्थान नाही. तरी पुनर्जन्म आणि बौद्ध पुजापाठ यांचे समर्थन बाबासाहेबांनी केले कि नाही? विज्ञान म्हणतो कि वस्तू बदलतात पण जन्म घेत नाहीत व मृत्यूही पावत नाही पण "पुनर्जन्म" म्हणजे, पुन्हा-पुन्हा जन्म घेणे वा होणे. पेटत्या ज्योतीचा आधार घेवून दुसरी ज्योत पेटविणे, आंब्याच्या कोई पासून झाड बनणे, आई-वडिलांपासून पुत्र होणे म्हणजे पहिल्याचा दुसरा पुनर्जन्म होय, अशी मानण्याची प्रथा आहे. पण पहिला हा दुसऱ्या सारखा (जसाचा तसा) कधीच राहिला नाही. एवढेच कशाला मुळ पहिला सुद्धा क्षणोक्षणी बदलत राहिला आहे. तेव्हा कोणत्या बदलाचे दुसरे हे नवीन रूप म्हणजे पुनर्जन्म मानायचे? भौतिक पदार्थाचे अर्थात चार महाभूतांचे रूप, बदलत असते. त्याला पुनर्जन्म या संज्ञेत बांधता येईल का? 

व्यक्ती जिवंत असतांना काल सारखाच आज नाही, आज सारखाच उद्या राहणार नाही. अर्थात कालचा आज नाही व आजचा उद्या नसणार तर तो मेल्यावर, त्याला गाडल्यावर वा जाळल्यावर तो पूर्वीच्या जिवंत व्यक्तींचा वा त्याच अवशेषांचा दुसरा जन्म कसा मानता येईल? पुनर्जन्म ही संकल्पना भारतात बुद्धाच्या आधीपासून हिंदू धर्मात ब्राम्हणांनी पोसली. शरीर मरते पण आत्मा मरत नाही. महायानी काय म्हणतात? चार महाभूत मरत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू हे मरत नाही तरी त्यांचा पुनर्जन्म होतो. पूर्वीच्याच जीवाचा वा चार महाभूतांचाच दुसरा जीव, जन्म होतो का? 

आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही पण भौतिक पदार्थांचा होतो ही दोन्ही मते अवैज्ञानिक, अज्ञानी नाहीत का? पहिल्याच्या लयानंतर होतो जन्म म्हणजे निर्मिती, यातील लय व उदय हे अवैज्ञानिक असत्य आहे. वे त्यांच्या अनित्य विचारला हे, विचार विज्ञानाला आणि बुद्धाला मान्य नाही. बुद्धाने “अनित्य” मानले, कार्यकारण परंपरा मानली. चार महाभूतांचा पुनर्जन्म होतो हे विचार अवैज्ञानिक असून ते महायानी भिक्षूंचे आहेत, ते बुद्धाचे नाहीत. बौद्धांना भ्रमित करण्यासाठी महायानी हिंदुनी ते धम्मविचार म्हणून घुसडले. त्यांना कवटाळून कोणाचाही फायदा नाही. पण त्याचा फार मोठा बाहु करून मृत भौतिक मानवी अवशेषांवर “चैत्य” उभारण्याला त्यांनी धम्म समजले. बुद्धाच्या दातावर, केसावर, नखावर, अस्थीवर विहारे उभारण्याची व त्यांची पूजा करण्याची रीत पुढे आली. भौतिक अवशेषांची पूजापाठ करणे म्हणजे बुद्धाचा “मध्यम मार्ग” आहे का? ह्या स्तुप, चैत्य पूजेच्या महाअंध:श्रद्धेतून जगाची पुनर्रचना लोकशाहीच्या नैतिक मुल्यांवर करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धाने “कार्यकारण सिद्धांत” सांगितला त्याला “प्रतीत्यसमुत्पाद” हे शीर्षक भिक्षूंनी दिले, बुद्धाने नाही. ह्या कारणाने ते होते. ते असल्याने हे होते, हे नसेल तर ते होत नाही, हे बुद्धाचे मत होते. जुन्याचे नवीन रूप आहे, असे बुद्धाने सांगितले नाही. बुद्ध धम्मानुसार कोणतीच वस्तू जन्म घेत नाही व मृत, नष्ट होत नाही. सर्व वस्तू “अनित्य” आहेत. सर्व वस्तू परिवर्तनशील आहेत. परिवर्तनातून नवीन वस्तूला जन्म, निर्मिती म्हणणे हे भिक्षूंनी ठरविले. बुद्धाने त्यालाही अनित्य मानले. स्थिर वस्तूला नावात बांधता येते पण अस्थिर गतीशिलतेला जन्म, पुनर्जन्म या नावात बांधता येत नाही. म्हणून बुद्धाच्या “ह्या मुळे हे होते” या विचारला उत्पत्ती व लय (विनाश) च्या विचारातून सिद्ध करता येत नाही.

“कार्य-कारण सिद्धांता”ला प्रदुषित करण्यासाठी महायानी भिक्षूंनी त्याला प्रतीत्यसमुत्पाद हे नाव दिले. प्रतीत्य म्हणजे प्रत्येय, कारण, हेतू. सम्मु म्हणजे समूह. प्रतीत्य सम्मु म्हणजे प्रत्येय, हेतू, कारणांचा समूह. तर त्पाद म्हणजे उत्पाद, निर्मिती, जन्म. कारणांच्या सामुहिक प्रयत्नातून कार्य यातून बुद्धाला नवीन निर्मिती वा उदय हा अर्थ अभिप्रेत नव्हता तर अनित्य, परिवर्तनीय घटना, कार्य असे अभिप्रेत होते. पूर्वीचा जन्म आज नाही, आजचा जन्म उद्या नाही म्हणजे “सर्व अनित्य”, अस्थिर, बदलत, परिवर्तीत होत आहे. महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या विचारणातून नव्हे तर हिंदू मानसिकतेतून “महायानी” भिक्षूंनी “पुनर्जन्म” मानला.

बुद्ध, धम्म आणि त्यांचा संघ


र्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)

(१) सम्यक दृस्टी- सम्यक म्हणजे उचित, श्रेष्ठ, परम आदर् आणि दृष्टी म्हणजे दृष्टीकोन, विचार, तत्वज्ञान ही सम्यक विचारांतील प्रथम पायरी आहे. त्यात “कार्यकारण सिद्धांत” म्हणजे “ह्या चे कारण हे आहे”. “ह्या मुळे हे होते”, “हे असेल तर ते होते,” पण “हे नसेल तर ते होणार नाही,” याचा बोध केला आहे. ते क्रमश: परस्परावलंबी, परस्परपूरक असून ते विचार धम्म राज्याला पूरक आहेत.
* अज्ञान * संस्कार * विज्ञान * नामरूप * षडायतन * स्पर्श * वेदना * तृष्णा * उपादान * भव * जन्म * उपायास ह्या एकूण १२ अंगाचा अर्थ अज्ञानामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतणामुळे स्पर्श, स्पर्शामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपदानामुळे भव, भवामुळे जन्म आणि जन्मामुळे उपायास अर्थात रोग, दुःख, निर्माण होते. दुःखाचे कारण केवळ एकटीच तृष्णा नसून इतर ११ अंगेही आहेत.
(२) सम्यक संकल्प- सम्यक दृष्टी प्रमाणे उचित निश्चयाचा सतत अंगीकार.
(३) सम्यक वाणी- सम्यक संकल्पा नुसार उचित संवाद सतत उपदेश.
(४) सम्यक कर्म- सम्यक वाणी प्रमाणे उचित कार्याचा सतत वर्तन.
(५) सम्यक आजीविका- सम्यक कर्मा नुसार उचित सदाचाराची सतत कामना.
(६) सम्यक व्यायाम- सम्यक उपजीविके प्रमाणे उचित प्रयत्नांची सतत सवय.
(७) सम्यक स्मृती – सम्यक व्यायामा नुसार उचित आठवणीची सतत जागृती.
(८) सम्यक समाधी- सम्यक स्मृती नुसार “उचित चित्ताची एकाग्रता”. ज्यातून धम्मराज्य म्हणजे विश्वाची पुनर्रचना होईल.

बुद्धाचा धम्म आदर्श लोकशाहीच्या निर्मितीसाठी कार्यरत प्रयत्न होता. त्यामुळे वर्णवादी लोकांचा समाजातील मान-सम्मान अपमानात बदलला. काही ब्राह्मणवादी लोक चिडले आणि बदला घेण्याच्या उद्धेशाने काहींनी संघदिक्षा घेतली. त्यातून मान-सम्मान मिळाला आणि धम्माला पोखरण्याचे कार्यही सुरु झाल्याचे समाधान मिळाले. बुद्ध धम्मात बहुसंख्य भिक्षु ब्राह्मण वर्गातील होते. म्हणूनच त्यापैकी काही अप्रामाणिक, कपटी निघाले. जे बुद्ध वचनाऐवजी आपली वचने बुद्धवचन म्हणून समाजात प्रचलित करीत होते. तशाप्रकारच्या तक्रारी बुद्धाजवळ आल्या असता त्यांनी धम्मवचनाला तर्कबुद्धीने तपासूनच अंगीकारण्याच्या सूचना केल्या.

बुद्धाच्या हयातीत काही भिक्षु बुद्धाला चमत्कारी पुरुष, गुढज्ञानी समजत होते. म्हणूनच किसा गौतमी आपल्या मेलेल्या मुलाला जीवंत करण्यासाठी बुद्धाजवळ आली होती. त्यामुळेच भिक्षु आनंदाने बुद्धाच्या अंतिम समयी "चमत्कारी" विचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व भिक्षूंच्या उपस्थितीत विचारले होते कि, काही विशेष (गुप्त) संदेश असेल वा उत्तराधिकारी नियुक्तीचा त्यांचा विचार असेल तर तो त्यांनी सर्वांसमोर (भिक्षु संघासमोर) व्यक्त करावा.

त्यावर बुद्धाने सांगितले कि “जनतेच्या हिताचा कोणताही संदेश मी द्यायचा बाकी ठेवलेला नाही. जो आवश्यक होता तो वेळोवेळी सर्व दिलेला आहे. माझ्या पश्चात भिक्षूंच्या विनायासंबंधी विवाद महत्वाचा नसून धम्मासंबंधी विवाद झाला तर तो संघांने एकत्र बसून अंतिम निर्णय होत नाही तोवर चर्चा करून “बहुमताने” सोडवायला पाहिजे. यानंतर धम्मच भिक्षु संघाचा व उपासकांचा आदर्श असेल.” (तथागत बुद्धाने या महत्वपूर्ण संदेशात "विपस्सनेचा" सन्देश दिला नव्हता, पण जर कुणाला माहिती असेल की त्यात विपस्सनेचा सन्देश सुद्धा सम्मिलित होता, तर तो त्यांनी जन प्रबोधनासाठी सादर करावा.)

बुद्ध, धम्म आणि विज्ञान

थागत बुद्धाने मात्र सुखासाठी प्रेमाचा आधार घेतला. पैशासाठी वा उत्पादनांच्या साधनांसाठी भांडू नका. कामवासना करा पण त्याच्या आहारी, अधीन जाऊ नका. त्याशिवाय सुद्धा जीवनात इतर सुखे आहेत. परस्पर सहयोगातून जगाची पुनर्रचना करण्यासाठी जीवन खर्च करा, असा होता. कार्ल मार्क्स रक्तरंजित क्रांतीचे समर्थक होते पण बुद्ध तसे नव्हते. रक्त सांडवून हुकुमशाहीची निर्मिती होईल पण लोकशाहीची नाही. हुकुमशाही ही जनतेवर थोपवली जाते पण लोकशाही ही स्वयं स्फूर्तीने अंगिकारली जाते. बाबासाहेबांना पीडितांची सुद्धा हुकुमशाही मान्य नव्हती हे त्यांच्या “बुद्ध कि कार्ल मार्क्स?” या भाषणातून विषद होते. व्यक्ती भुकेला असेल तरी चालेल पण तो गुलाम नको, या विचारांचे बाबासाहेब होते म्हणून त्यांनी “राज्य-समाजवादाचा” सिद्धांत त्यांनी भारतापुढे मांडला पण थोपला नाही.

शरीरात आत्मा कुठे आहे? आत्माचे, स्वर्गाचे विचार वैज्ञानिक आहेत का? सूर्यापासून पृथ्वी बनली असा शोध लागला. सूर्याचा आकार ६,३६०,८० किमी एवढा प्रचंड आहे. तो गरम व लाल रंगाचा द्रव पदार्थ आहे. त्यातील प्रत्येक अनु, रेणू, हे प्रोटान, इलेकट्रान, न्युट्रान अशा या चुंबकीय शक्तींनी बनलेले आहेत. ही शक्ती त्याला गतीशिलतेच्या गुणधर्मापासून मिळाली आहे. त्यापासून सूर्य १५ प्रकारची विविध किरणे, तरंग बाहेर सोडतो. त्यापैकी पृथ्वीवर ८ रंगाची किरणे दिसत नाही पण सात रंगाची दिसतात. ती ८ मिनटात पृथ्वीवर ६५ लाख किलोमीटर अंतर कापून येतात, पृथ्वी ४.६ कोटी वर्षाआधी सूर्यापासून वेगळी झाली. तेव्हा ती सुद्धा गरम होती.

पृथ्वी सतत फिरत आहे अर्थात गतिशील आहे. हा गुणधर्म सुर्यानीच पृथ्वीला दिला. गतीशिलतेमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती माहित झाली दिवस-रात्र होते. दिवस म्हणजे सूर्याच्या प्रकाशात जाणे व रात्र म्हणजे सूर्यप्रकाशापासून वंचित होती, अंधारात जाणे. पृथ्वी म्हणजे पाणी आणि खनीजानांचे मिश्रण आहे. पृथ्वीवरील खनीजांचे अतिसूक्ष्म कन म्हणजे हवा, वायू होय. ती पृथ्वीपासून सुमारे १००० किलोमीटर दूर पर्यंत उडते. पृथ्वी पासून सुमारे १५-४० किमी अंतरावर ओझोन (वायू)चा स्थर असतो. तो सूर्याची घातक किरणे रोखतो. त्याला सध्या छिद्रे पडली म्हणून ती किरणे पृथ्वीवरील सजीवांवर विपरीत परिणाम करतात, त्यानेही प्राणी आजारी, रोगी होतात. तो “ईश्वरी कोप” नाही. आत्मा शरीरतातून आकाशात जातो म्हणजे कुठे, किती दूर असतो?

पृथ्वीवर १००० किलो मीटरच्या आत रसायन शास्त्राच्या भाषेत Xe, N2o, H2, CH4, He, Ne, CO2, Ar, O2, N2 ईत्यादी प्रमुख वायू असतात. पृथ्वीपासून १०-१२ किमी अंतरावर बाष्प असतो. तेवढ्याच अंतरावरून पृथ्वीवर पाउस येतो. पण तो देव पाठवतो म्हणून येतो असे नाही. ती एक भौतिक व भौगोलिक क्रिया आहे. देवाने सूर्य निर्माण केला नाही, चंद्रही बनवला नाही. त्यांना बनवतांना कोणी पाहिलेही नाही. पृथ्वीवर पाणी, जंगल, पहाडे ईश्वरांनी बनवले नाही.

पृथ्वीच्या गतिशील गुणधर्मांच्या परिणामाचा एक भाग आहेत. वायू म्हणजे अनेक भौतिक पदार्थाचे रूप तर पाणी म्हणजे दोन वायुंचे मिलन होय. प्राणवायु व हायड्रोजन वायुंचे मिश्रण म्हणजे पाणी होय. ते देवांनी बनवले नाही. देवाचे राज्य स्वर्गात आहे, ते आकाशात आहे म्हणजे पृथ्वीपासून दूर अंतरावर आहे? असा प्रचार चालू आहे. स्वर्गात देव हवा-पाणी वापरतात कि नाही? देव हवा घेतात; पाणी पितात कि नाही? देव हवा घेत असतील म्हणून त्यांना नाक आहे. पृथ्वी पासून दूरवर अर्थात हवेत स्वर्ग आहे म्हणजे किती किलोमीटर दूर आहे? हे स्वर्ग प्रेमी, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम लोकांनी व महायानी भिक्षुंनीही सिद्ध करून केले का?

देव स्वर्गात आहेत तर “ओझोन” वायूचे गड्डे बुझवण्याचे कार्य ते का करीत नाही? ओझोन म्हणजे ‘ओ३’, प्राणवायूचे ३ संयुगे. सूर्यकिरण व प्राणवायूच्या संयोगातून, मिलनातून ओझोन वायूची निर्मिती होते. सूर्य किरण सूर्य देतोच, पण वृक्षतोडीतून प्राणवायू बनविणे बंद होत आहे. झाडे पृथ्वीवर लावल्याशिवाय प्राणवायू बनणार नाही म्हणजे घातक सूर्य किरणांना रोखणारा ओझोन वायू निर्मितीस पृथ्वीवरील मानव प्रयत्न करू शकतो. स्वर्गात कोणत्याही काल्पनिक, अवैज्ञानिक देव नाही व स्वर्ग ही नाही माणूस मरतो व आत्मा देवाच्या राज्यात, स्वर्गात जातो. त्याला नेण्यासाठी “यमदूत” (देवाचा दूत) येतो. ही हिंदू धर्मातील कल्पना महायानी भिक्षूंनी त्रिपिटकात उतरवली. त्याला सम्राट अशोक राजा सुद्धा बळी पडले. स्वर्गीय सुखासाठी त्यांनी “सर्वधर्मसमभावी” धोरण लागू केले होते. कारण त्यांना मेल्यानंतरही सुख हवे होते.

मानवांना जन्म देव नाही तर आई-वडील घालतात. म्हणून आर्य-वडिलांना देव माना असा काहींचा समज बनला, पण तो चुकीचा आहे, कारण तो देव पूजेला खतपाणी घालतो, भक्तीभाव निर्माण करतो. भक्तीभावात अंध:श्रद्धा असते, विज्ञान नसते. प्रेम हवे पण भक्ती नको. झाडे जमिनीतून क्षार, प्रथिने, जीवनसत्व व पाणी शोषून स्वत:चे अन्न तयार करतात. प्राणीही ते खातात व जगतात. शेवटी मरतात. त्यावर सूक्ष्मजीव वाढतात. त्यांच्यापासून जीवाणू निर्माण होतात. ते जमिनीत मुरतात. झाडे त्यांना मुळाद्वारे शोषुण घेतात. म्हणजे “क्षार” (मिनरल) हे विविध जीवात-निर्जीवात बदलत असतात. क्षारांअभावी जीवन रोगी होते, निरोगी जीवनासाठी व्यक्तीला पुरेसे क्षार, जीवनसत्व, पाणी, उष्णता व शुद्ध हवा म्हणजे मुबलक प्राणवायू हवा कि, ईश्वरी आशीर्वाद?. मानवी जीवनासाठी सूर्याची फार इन्फ्रारेड नावाची किरणे हवीत (४ ते १६ मायक्राण) हवीत, ते सुद्धा जर खंडित, अपूर्ण वा अशुद्ध स्वरुपात मिळाली तर विविध आजार होतात. हा ईश्वरी कोप म्हणायचा का?

मानवी शरीराला दैनंदिन जीवनात जवळपास ८३ प्रकारचे क्षार (मिनरल) जरुरीचे आहेत. क्षाराशिवाय प्रथिने, प्रोटीन व जीवनसत्व कोणतेही कार्य करू शकत नाही. शरीर एकदाचे जीवनसत्व बनवू शकेल पण क्षार नाहीत. म्हणून भरपूर जीवनसत्व आहारात घेवूनही काही आजार ऐकत नाही. त्याचे कारण ईश्वरी कोप नव्हे वा ईश्वरी आशीर्वादाचा अभाव नसून पर्याप्त “क्षार” वा योग्य त्या पदार्थाचा तुटवडा होय. जे आजार जीवनसत्वाने जात नाही शुद्ध हवा, पाणी व सूर्य किरण घेवूनही जात नाहीत ते “योग्य” त्या क्षारांच्या पुरवठ्याने जातात हे विज्ञानाने आता सिद्ध करून दाखविले आहे. असे असतांना महायानी “बौद्ध पूजापाठ” व त्यातून भिक्षुंचा आशीर्वाद कशाला हवा? आशीर्वादानेच जगाची पुनर्रचना करण्याचे कार्य बुद्धाने का केले नाही? बुद्ध विहारात थांबले ते वर्षावासाठी, पुजापाठासाठी नाही. आजचे बुद्धविहारे म्हणजे परित्राणसूत्र पाठाचे, पूजांचे देवस्थान बनले आहेत. तिथे विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टी आहे का?

धम्मदीक्षा : एक क्रांतिकारी पावुल


मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन धर्मात हिंदू धर्मासारखे देवी-देवता, नशीब, स्वर्ग-नरक, पाप-पुण्य नाहीत का? याचा शोध घेतला असता तिथेही हे प्रकार आहेत. म्हणून हिंदुधार्मापासून अंतर म्हणजे चातुर्वर्ण्य, जाती, अश्पृस्यता यांच्या पासून अंतर तर आहेच तद्वतच जैन, मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मांपासून ही अंतर घेणे होय. कारण त्यात विज्ञान नाही. भेदभावाचे व अंध:श्रद्धांचे प्रकार ज्या-ज्या धर्मात आहेत ते ते धर्म बाबासाहेबांनी नाकारले. कारण धर्म म्हणजे देवाची, स्वर्गाची आश आहे, ती नुसती काल्पनिक आहे आणि अज्ञान आहे. तर्काच्या वा विज्ञानाचा आधारे ती सिद्ध करता येत नाही.

देव, आत्मा, देऊळ, पूजा, स्वर्ग हे लोकांच्या, भक्तांच्या शोषणाची साधने आहेत. भक्तांनी त्याचा मोह सोडला तर ते तर्कवादी होतील व देव, धर्माच्या पुरोहिती जाळ्यात ते सापडणार नाहीत. ते स्वार्थी लोकांच्या शोषणापासून स्वतःचे रक्षण करतील, अशी समज बाबासाहेबांची होती. हिच समज बुद्धाचीही होती. म्हणून बुद्ध-आंबेडकर या दोघांच्या विचारात फारच साम्य असल्यामुळे ते एकजीव, एकत्रित झालेत. बुद्धाच्या मार्गाला बाबासाहेबांनी धर्म वा रिलीजन मानले नाही. कारण बुद्ध विचारात धर्मातील ईश्वर, आत्मा, पूजापाठ, स्वर्ग-नरक, नसीब यापैकी काहीही नाही. बौद्ध साहित्याचा अभ्यास केल्यावर हिंदू धर्मापासून बुद्ध विचार भिन्न, वैज्ञानिक, क्रांतिकारी व कल्याणकारी लोकशाहीवादी असल्यामुळे बाबासाहेब बुद्धाला शरण गेले, बुद्धाच्या जवळ गेले. बुद्धाच्या विज्ञानवादी विचारांमुळे त्यांनी धम्माचा मार्ग लोकांना सांगितला.

नागपूरला पत्रकारांशी चर्चा करतांना “मी आता बौद्ध झालो असल्यामुळे जातीवर आधारित कोणत्याही संघटनेचा सभासद म्हणून कार्य करणार नाही, कारण बौद्ध धम्मात जाती नाहीत.” असा संदेश दिला होता पण १९५६ नंतर उदयास आलेल्या आंबेडकरी आंदोलनाचे नाव घेत जातीवादी नाव धारण करून “जाती तोडण्याऐवजी जोडण्याच्या” कार्याला लागल्या. केवळ राजकीय फायद्यासाठी धम्म तत्वाची होळी करायची का? धम्मापेक्षा राजकारण मोठे का? जाती जोडण्यातून धम्म विचारांशी विसंगत विविध जातीवादी लोकांना बुद्धाच्या पंगतीत बसविण्यात आले, ते आंबेडकरी जनतेने कसे मुग गिळून सहन केले हेच आता समजत नाही. हे त्यांच्या जागृतपणाचे लक्षण आहे का? हा भारतीय बौद्धांपुढे फार मोठा प्रश्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर करवी “धम्मदीक्षा” घेवून आज ५6 वर्षे पूर्ण उलटली पण भारत देशाला धम्ममय का करू शकलो नाही? हा एक फार चिंतेचा प्रश्न आहे. बुद्धाची धम्मक्रांती विफल का झाली? व तिला सफल बनविण्यासाठी काय केले पाहिजे? ते लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. धम्म म्हणजे निश्चित कोणते विचार? ते स्पष्ट नसणे.
२. भिक्षुंकडून भेसळयुक्त विचारांचा सतत प्रसार होने.
३. प्रतिगामी महायानी विचारांचा महास्थविर संघरक्षित, ओशो राजनिश, सत्यनारायण गोएनका यांचा वाढता प्रभाव.
४. परंपरागत धम्म विचारांनी युक्त परदेशी जापानी भन्ते सुरई ससाई, संघरत्न माणकेचे अवास्तव अनुकरण करणे.
५. आदर्श लोकशाही म्हणजे धम्म कसा? जातिगत आरक्षणालाच प्रगतीकारक धम्म समजू लागले.
६. क्षुल्लक आर्थिक जातिगत आरक्षणाला धरून जाती व्यवस्थेने जतन करण्यात आंबेडकरी जनता मग्न झाली.
७. केवळ १०% लोकांनाच फायदेशीर असणाऱ्या जातिगत आरक्षणाला टिकविण्यासाठी अवास्तव महत्व देणे.
८. कार्यकर्त्यांना पोटार्थी समजून त्यांचा अपमान, भ्रमित विचारांचा प्रसार करणाऱ्या भिक्षुंना सन्मान देण्यात देणे.
९. धम्माला वैज्ञानिक आदर्श लोकशाहीला पूरक अशा विचारांवर नवीन मांडणी केल्या गेली नाही.
१०. धम्माला सोपी, वैज्ञानिक व व्यवहारिक करण्याची गरज लक्षात घेतल्या गेली नाही.
११. भिक्षूंचा धम्म म्हणजे बुद्धाचा धम्म नाही तरीही त्याचा पाठलाग करण्यात आला.
१२. या कारणांमुळे भारतच कशाला, केवळ नागपुरातील लोकांना सुद्धा धम्ममय करता आले नाही.

धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक १५ आक्टोंबर १९५६ ला दिक्षभूमी, नागपूर येथील भाषणात बाबासाहेबांनी कळकळीची सूचना केली. ती प्रबुद्ध भारत या ठिकाणी ठळक अक्षरात दि. २७ आक्टोंबर १९५६ ला प्रकाशित झाली. त्याकडे खऱ्या अर्थाने दुर्लक्ष झाल्यामुळे धम्म प्रचाराचा रथ थांबला. त्याला जर प्रामाणिकपणे गतिमान करायचे असेल तर बाबासाहेबांची ती सूचना सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे हि, “तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे..... नाहीतर महार लोकांनी धम्म निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये. म्हणून आपण निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, ईतकेच नव्हेतर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. “आपापल्या प्राप्तीचा २० वा हिस्सा या कामी देईन असा, निश्चय करावा........ समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे मी जाहीर करतो.” जे समाजकार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” म्हटले आहे. ते म्हणतात, “समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात....बाकीचे सार्वजन शेणातील किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.” (बामसेफच्या आंबेडकरद्रोही भूमिकेची छाननी, एस. डी. भवार, पृष्ठ-२०२) अशा माणसांना ‘तू शेणातल्या किड्याप्रमाणे जीवन जगतोस’ याची जाणीव करून देणे, हे प्रत्येक सुशिक्षितांचे कर्तव्य आहे.

सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म हा वर्ण विरोधी, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, मानवात न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुभावाची लोकशाही मुल्ये शिकविणारा आहे. जगात वैज्ञानिक लोकशाही विचारांवर अधिष्ठित राज्य चालावे. ते लोकांनी, लोकांच्या स्पर्धेतून नव्हे करता तर “लोक सहयोगातून वैचारिक परिवर्तन” घडवून आणावे, अशी बुद्धाची इच्छा होती. संपत्तीची अमर्याद मालकी त्यांना नको होती तसेच संमतीच्या साधनांचा त्यांना हव्यासही नको होता.

मानवी सुखापुढे संपत्ती गौण, शून्य आहेत. म्हणूनच संपत्तीचा अवास्तव, असीमित मोह त्यांनी टाळला. बुद्धाचा सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे “सम्यक मार्ग” होय, तो वैज्ञानिक, आदर्श लोकशाही युक्त, धर्मनिरपेक्ष आणि परस्परात सौख्य निर्माण करणारा आहे. त्यामुळेच विश्वातील सर्व जनता सुखी होती. धम्मदीक्षितांनी “वैज्ञानिक धम्म” सतत पाळून व त्याचा प्रचार-प्रसार करून विश्वात धम्म राज्य निर्माण करावे तरच बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेला खरा अर्थ प्राप्त होईल. महामानव गौतम बुद्धाच्या धम्माला “सम्यक दृष्टी” म्हणजे “वैज्ञानिक दृष्टी” समजून “जगाची पुनर्रचना” करण्याची कधी नव्हती एवढी आज नितांत गरज आहे.

जाती जोड़ो अभियान और तानाशाही माया

भारत में केवल १% बौद्ध है.... तो बामसेफ और बीएसपी के सरकारी कर्मचारियों ने बुद्ध के धम्म क्रांति में कितना सहयोग दिया है? अम्बेडकरवाद का महत्वपूर्ण अंग बुद्धिज़्म है, जिसे भारत में फ़ैलाने का कार्य बाबासाहब अम्बेडकर ने अपने आंगपर लिया था परन्तु उनका जयघोष करनेवाले बामसेफ, बीएसपी के सरकारी कर्मचारी बेईमान निकले.


देश में बुद्धिज़्म को बढ़ावा देने के बजाए जातिभेदभाव बढाने के लिए कार्य कर रहे है. उसी का नतीजा है आज सबसे ज्यादा जातिवादी हिंसाचार बीएसपी का बोलबाला होते हुए भी हो रहे है. तो प्रश्न यह उठता है की बीएसपी सिर्फ जातिवादी सत्ता चाहती है या जातिभेदभाव को ख़त्म भी करना चाहती है.?

पिछड़े सरकारी कर्मचारियों के दम पर बनी बीएसपी पार्टी जातियों को बरक़रार रखते हुए केवल सत्ता चाहती है, यह भी एक जातिवादी राजनीती है, उसे बौद्ध धम्म प्रचार के अंग से जोड़ना बेवकूफी के आलावा और कुछ भी नहीं है. जातिगत पिछड़े वर्ग के सरकारी या निजी कर्मचारियों ने यह साबित करना चाहिए की उन्होंने बाबासाहब अम्बेडकर के धम्म प्रचार में सहयोग दिया है, अगर दिया है तो कोनसा है?

केवल अपना परिवार चंगा करना और जाती के नामपर लोगों को भड़काकर वोट मांगने के शिवाय किया ही क्या है? यह धम्म प्रचार का महत्वपूर्ण हिस्सा नहीं हो सकता, क्या बुद्ध-अम्बेडकर साहब की मुर्तिया रास्तों पर खडी करना ही धम्म प्रचार है? लोगों को अम्बेडकर या बुद्ध की तस्वीर या मुर्तिया दिखाकर जातिवाद के विषमतावादी कीड़े को कतम कर सकते है?

स्पष्ट है बामसेफ, बीएसपी अम्बेडकरवादी पार्टी नही है तथा वह बौद्ध लोगों की हिमायती भी नही है, वह केवल जातियों के दमपर दुसरे जातियों से खुद को ऊँचा साबित करना चाहती है, जातिवाद के आधारपर कोई भी व्यक्ति ऊँचा नहीं हो सकता, चाहे वह ब्राह्मण हो या चमार, जातियों को अगर विदेश में जाकर बेचो तो नगण्य मूल्य मिलेगा, क्या राजनीती के आधारपर धम्म प्रचार करना संभव है?

अगर ऐसा ही होता तो हिन्दू धर्म को माननेवाले कांग्रेस के पास कहीं बरसों से सत्ता है पर वे भारत को बौद्ध, जैन, मुस्लिम और इसाई मुक्त कर सके? सत्ता के डर से न धम्म का प्रचार संभव है और न कोई भी धर्म प्रचार, इसलिए सत्ता आनेपर हम सबकुछ करेंगे का नारा बेबुनियाद के विचारों पर खड़ा है.

उत्तर प्रदेश में ९ साल तक बीएसपी की सत्ता रही फिर भी वहां के जातिवाद को वह ख़त्म नही कर सकी तो उनके हाथ में देश की सत्ता देनेपर वह कैसे कर पायेगी ? इसका प्रारूप उन्होंने जनता को समझाना चाहिए, न की जोर जबरन या हिंदूइस्म के डर को बताकर राजनीती नही करनी चाहिए. अगर बीएसपी बौद्ध विचारों की पार्टी होती तो उन्होंने अपने मंत्रियों को धम्म शिक्षा दी होती जिससे वे भ्रस्टाचार के शिकार नहीं होते.

बीएसपी के करीब ९०% मंत्री भ्रष्ट्राचार में लिप्त होनें का आरोप यही बात सिद्ध करता है, की बीएसपी बुद्धिज़्म का नही तो हिंदूइस्म का प्रचार करती है. मायावती के मूर्तियों का जब विरोध किया जाता है तब बीएसपी के नुमैन्दे यह तर्क देते है की जब कांग्रेस-बीजेपी करती है तो उनका विरोध क्यों नही किया जाता?

दूसरी पार्टी अगर गलत करती है तो उसका विरोध करना चाहिए या उनका अनुकरण? बीएसपी दुसरे पार्टियों के दुर्गुणों का अनुकरण करके सही, उचित, योग्य साबित नही हो सकती. चाहे कोई भी पार्टी रहे अगर दुर्गुणों का समर्थन और अनुकरण करती है तो वह जनतंत्र के लिए खतरा पैदा करती है. उसमे बीएसपी भी दूध की धूलि नही है, जो भारतीय बौद्ध है, जो अम्बेडकरी प्रेरणा से बौद्ध विचारों को अपनाने का दावा करते है, उनका क्या फर्ज है?

क्या राजनीती पाने के लिए धम्म विचारों की क़ुरबानी देना चाहिए? अगर राजनीती जीवन का एक अभिन्न अंग है तो क्या उस अंग में बुद्धिज़्म के विचार होना अनुचित है? राजनिति में धम्म विचार क्या जनतंत्र के लिए खतरा है? अगर वह जनतंत्र को फायदेमंद है तो उसे जनतांत्रिक लोगों ने दूर रखने की कौनसी जरुरत है?

जनतंत्र ही धम्म है और धम्म ही जनतंत्र है. जो धम्मधारी लोग या राजनीती में धम्म विचारों का विरोध करते है वे धम्म विरोधक है, उनके जरिए सत्ता भी आए तो वह धम्म प्रचार करेंगे इसकी कोई भी शास्वती नही है. मायावती के अंग अंग में हिन्दुधर्म का जातिवाद कुटकुट कर भरा है, जो बुद्धिज़्म का हिस्सा नही है, उनके जरिए धम्म प्रचार का सपना देखना मुर्खता के अलावा और क्या हो सकता?

विपस्सना : एक महायानी (हिन्दू) षड्यंत्र



विपस्सना हा पाली भाषेतील शब्द आहे पण तो प्राचीन त्रिपिटकात नाही. तो अर्वाचीन आहे. “पस्स” म्हणजे “पहा” होते तर “पस्सना” म्हणजे “पाहणे” होते आणि विपस्सना म्हणजे “विशेष पाहणे.” हिंदुधर्म विरुद्ध ज्याप्रमाणे बुद्धधम्म मानले जाते त्याचप्रमाणे बुद्धधम्म विरुद्ध महायान सुद्धा मानले जाते. याचा अर्थ बुद्धधम्म म्हणजे हिंदुधर्म आणि महायान. हिंदुधर्माने धम्मावर बाहेरून सरळ हमला केला तर महायान पंथाच्या माध्यमातून अंतर्गत हमला करण्यात आला. दोघांच्याही विचारांचा धम्मविचारांवर मोठा हमला, आघात झाला. धम्माला महायान पंथ म्हणजे अस्तनीतले साप ठरले. सुरुवातीपासूनच बौद्धांनी हिंदू विचारांच्या विषारी सापांना दुध पाजण्याचे कार्य केले. 

बौद्धांनी बाह्य शत्रूंचा विमोड केला पण अंतर्गत महायानी शत्रूंच्या विषारी चाव्याने बौद्ध जनता बेहोश झाली. त्यांची तर्कशक्ती गेली. आज त्याचाच परिणाम आहे बौद्ध लोक केवळ बुद्धाचा फोटो वा मूर्तीत धम्म शोधण्याचा मूर्खपणा करीत आहेत. हिंदुधर्माचे हे महायानी बांडगुळ जोपर्यत बौद्ध लोक पोसतील तोपर्यंत बौद्धांची दिशाभूल कोणीही रोखू शकणार नाही. म्हणून षड्यंत्रकारी महायानी पंथाचा, त्याच्या विचारांचा अंत करणे, हे बौद्धांचे प्रथम कर्तव्य आहे. अंतर्गत शत्रूंचे लाड पुरवून बाह्य शत्रूंशी भांडत बसण्यात बुद्धिमत्ता नाही. महायानी हिंदुधर्मीय विचार आंबेडकरी बौद्ध लोकांच्या अंगात शिरत चालले आहेत. त्याचा खात्मा केलाच पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

जनतेचा “महानायक” या दैनिकात दिनांक २७ फेब्रुवारी २०१३ ला माजी न्यायाधीश अनिल नि. वैद्य यांच्या “विपश्यना म्हणजे काय? गैरसमज व शंकांचे निरसन” या पुस्तकाची समीक्षा मिलिंद फुलझेले यांनी लिहिली. त्यात आंबेडकरी जनतेवर धम्मज्ञानी नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि आचार्य सत्यनारायण गोयनका उर्फ गोयंका गुरुजी यांना बुद्ध धम्माचे महापंडित, महाउपासक व महागुरू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा परामर्श घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचे प्रयत्न किती खोटे आणि बेजबाबदारीचे आहेत हे वाचकांच्या लक्षात आणून देणे हाच या ठिकाणी उद्धेश आहे. “धम्माचे प्रात्यक्षिक : विपश्यना” या समिक्षेची ही उजळणी आहे. 

प्राचीन गणराज्य पद्धतीवर सुद्धा वर्णव्यवस्थेची छाप होती. शाक्यसंघ हे गणराज्य पद्धतीप्रमाणे कार्य करायचे परंतु त्याचा सेनापती ब्राह्मणवादी “ब्राम्हण” होते. त्यांना वर्णाश्रम व्यवस्थेचा अभिमान होता. क्षत्रिय लोकांच्या संघात ब्राम्हणाचे पद काय दर्शवतो? गणराज्य पद्धती ही वर्णवादी विचारांनी बरबटलेली होती. सिद्धार्थाने कधीही वर्ण व्यवस्थेचा अभिमान केला नाही. उलट तिला तोडण्यासाठीच शाक्यसंघ सेनापतीच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे शाक्य विरुद्ध कोलिय यांच्यातील युद्ध टळले पण वर्णव्यवस्था विरोधी आंदोलन सिद्धार्थ गौतमच्या रूपाने सुरूच राहिले. त्याला संपण्याच्या विचारांचा शोध म्हणजे धम्म पुढे आला.

बुद्धाने सारनाथ येथे ई.सा.पु. ५२८ ला जो “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” उपदेश प्रथम धम्म प्रवचनात पंचवर्गीय (ब्राह्मण) भिक्षुंना केला तोच उपदेश कुशिनारा येथे ई.सा.पु. ४८३ ला अंतिम शिष्य सुभद्र यांनाही दिला. तो म्हणजे “सुभद्र! तथागताच्या धम्म व विनायात आर्य अष्टांगिक मार्ग आहे. जर धम्म व विनय सम्यक मार्गाने चालले तर जगात जागृत लोकांची कधीच कमी होणार नाही.” (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, “द बुद्ध अंड हिज धम्म,” ७:३:२:१३) आर्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)