बुधवार, 2 सितंबर 2020

धम्म म्हणजे आदर्श लोकशाही


म्म म्हणजे "आदर्श लोकशाही" आहे तर न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांची संयुक्त जोपासना म्हणजे धम्म होय. ज्याप्रमाणे सम्यक दृष्टी वर सम्यक संकल्प, सम्यक संकल्पावर सम्यक वाचा, सम्यक वाचेवर सम्यक कर्म, सम्यक कर्मावर सम्यक आजीविका, सम्यक आजीविकेवर सम्यक प्रयत्न, सम्यक प्रयत्नावर सम्यक स्मृती आणि सम्यक स्मृतीवर सम्यक समाधी निर्भर आहे. त्याच प्रमाणे न्यायावर स्वातंत्र्य, स्वातंत्र्यावर समता, समतेवर बंधुभाव आणि बंधुत्वावर विश्व अधिष्ठित आहे. दिनांक ३ आक्टोंबर १९५४ रोजी दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण प्रसारित झाले त्यात त्यांनी या विषयावर भरपूर प्रकाश टाकला तो असा, “स्वातंत्र्य, समता आणि सहभाव हे नैतिक मूल्य फ्रेंच राज्य क्रांतीपासून उसने घेतले नसून ते माझे जीवन विषयक तत्वज्ञान मी माझे गुरु गौतम बुद्धा पासून घेतले आहे. माझ्या तत्वज्ञानाचे मुळ राजकारणात नसून धम्मात आहे. माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक असते... 

“माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे, तरी सुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वतात्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून स्वरक्षण मिळावे म्हणूनच कायदे-कानुनचे स्थान गृहीत धरलेले आहे पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या भंगाबाबद कायदा खात्रीने मदत करू शकेल यात मला विश्वास वाटत नाही. मी बंधुत्वाला सर्वोच्च स्थान देवू इच्छितो कारण स्वतंत्रता आणि समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंदुभावाचे दुसरे नाव आहे. आणि बंधुभाव आठव मानभाव हे धम्माचे दुसरे नाव आहे... 

“कायदा व सह्भावाचे मूल्यमापन करतांना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. या उलट सहभाव अथवा धम्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्याकाचे कर्त्यव्य गणले जाते...राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व सहभाव या जीवन मूल्यांना मान्यता मिळाली आहे तथापि प्रचलित हिंदू सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे हि तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझा माझ्या जीवन विषयक तत्वज्ञानावर पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा तो राजकीय ध्येयवाद बनला आहे. तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल, अशी मला उमेद आहे.” (मुक्तछंद, सन- १९७६) धम्मातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा अतिरेक, कमी व अधिक टोके टाळण्यासाठी तो सम्यक, मध्यम, उचित, श्रेष्ठ, परम, आदर्श, आचरणशील, सर्वांगीण व सर्वांना कल्याणकारी अशा लोकशाही तत्वावर, विचारांवर उभा आहे...

प्राचीन भारतीय इतिहासाला राजकीय अंग कसे होते? ते सांगताना दिनांक २४ सप्टेम्बर १९४४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मद्रासच्या ‘प्रभात’ टॉकीजमध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “जगात कुठल्याही देशात प्राचीन हिंदुस्थान सारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बदुधा एकाच देश असा आहे कि, जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती.....बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दांत सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाल्यास कुन्या अधिकाऱ्याने सांगितलेली गोष्टच सत्य, असे नाही. उलट ब्राम्हणांचे म्हणणे असे कि, जे वेदाप्रमाणे आहे तेच सत्य (हास्य). बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राम्हण प्रतिगामी. जर ईस्लाम धर्माने ह्या देशात पाहुल टाकले नसते तर आणखी काही काल हा ब्राम्हण बौद्धातला लढा चालला असता. जगाच्या इतिहासात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा आदेश देणारे ‘बुद्ध’ हेच पहिले व्यक्ती असतील......धर्म, अर्थ, संस्कृती व राजकारण एकात जुंपून चालणारी चातुर्वण्य व्यवस्था ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली.”

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या चार लोकशाही मुल्यांवर तत्वावर धम्म अधिष्ठित आहे. बुद्धाने भिक्षु संघ ही सम्यक, नैतिक मूल्यावर विनय नियमांची निर्मिती केली. संघात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. कार्ल मार्क्सच्या ‘कम्युन” मध्ये आणि भिक्षूच्या “संघा” मध्ये फरक तो हाच आहे. भिक्षुसंघ लोकशाही विचारांवर तर साम्यवादी “कम्युन” हा शोषित कामगारांच्या हुकुमशाहीवर अधिष्ठित आहे. म्हणूनच धम्मापेक्षा साम्यवाद महान नाही, तर तो लहान आहे. कारण ‘कम्युन’ द्वेषावर तर धम्म प्रेमावर अधिष्ठित आहे. द्वेषाचे आयुष्य कमी तर प्रेमाचे आयुष्य जास्त असते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’च्या, खंड आठव्यातील, भाग तीन मध्ये, बुद्धाचा “सम्यकवाद” "कार्यकारण" सिद्धांतात मांडला, तो बघूया.
१. तृष्णे मुळे लाभाची ओढ होते.
२. लाभा मुळे कामवासना निर्माण होते.
३. कामवासने मुळे लालसा निर्माण होते.
४. लालसे मुळे दृढता (हाव) निर्माण होते.
५. दृढते मुळे स्वामित्व (स्वार्थ) निर्माण होते.
६. स्वमित्वा मुळे (अमर्याद) लोभ निर्माण होते.
७. लोभा मुळे अधिक स्वामित्व (आसक्ती) निर्माण होते. 
८. स्वमित्वा मुळे संपत्तीवर पहारा (कुंपण) होतो.
९. पहाऱ्या मुळे संघर्ष (झगडा) निर्माण होतो.
१०. संघर्षा मुळे निंदा (अपमान) निर्माण होते.
११. निंदे मुळे असत्य (खोटेपणा) बाहेर येते.
१२. असत्य बाहेर आल्यामुळे दुःख (पश्चाताप) निर्माण होते. 

ही प्रतीत्यसमुत्पादाची अनुलोम साखळी आहे. मज्जीम निकायातील “चुलसकुलदायि सुत्तात” प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धांत आहे. “इमस्मिम सती ईदं होती.” (ह्या च्या होण्याने हे होते.) “इमस्मिम असती ईदं न होती.” (ह्या च्या नसल्याने हे होत नाही.) “इमस्य विरोध ईदं निरुज्झती.” ('ह्या' च्या विरोधाने 'त्याचा' विरोध होतो.) कोणताही संस्कारित पदार्थ नित्य, अशाश्वत नाही तर तो अनित्य आहे, क्षणिक आहे. कार्य पदार्थाच्या कार्यकारण सिद्धांतामुळे होते. प्रतीत्यसमुत्पादाला “मध्यम वर्ग” सुद्धा म्हणतात. प्रत्येयामुळे उत्पन्न (उत्पाद) नव्हे तर ‘परिवर्तन’, अनित्य होते. प्रतीत्यसमुत्पाद हा शब्द भिक्षूंची देन आहे, त्यामुळे इथे तो शब्द महत्वाचा नसून त्याचा अर्थ “ह्या मुळे हे होते” ते होतच राहते, हा ‘अनित्य बोध’ महत्वाचा आहे. 

ब्राम्हणवादी व मार्क्सवादी विचारांचे लोक समाजावर हुकुमशाही लादत असतील तर त्याचा विरोध करावा, हा बाबासाहेबांचा संदेश होता. त्याचप्रमाणे जातीच्या नावावर महारांनी मांगांवर, चमारांणी महार जातीवर व इतर जातीवर सुद्धा हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करू नये. असे बाबासाहेबांचे स्पष्ट विचार होते. जाती, धर्म व वर्ग विचारी लोक मूर्खच नव्हे त्यातील बरेच लोक अज्ञानी, तानाशाही, हुकुमशाही वृत्तीचे असतात. त्यात फारच कमी लोक ज्ञानी व लोकशाही विचारांचे असतात. कोणताही वर्ग बौद्धिक दृष्ट्या परिपूर्ण, स्वच्छ नाही म्हणून जाती, वर्ग, वर्ण व धर्म या विषयांवर भांडत बसने, त्यांचा मनात गर्व बाळगणे, ते सोडणे आवश्यक आहे. तरच धम्मातील नैतीकेची शिकवण आपल्या आचरणात येईल. त्यातूनच आपल्या संघटना, संस्था मजबूत होतील, व उद्देशपूर्ती होईल.

मंगलवार, 1 सितंबर 2020

आर्य-नाग संघर्ष बेबुनियाद



आधुनिक संसार को काफी खतरनाक समस्याओं ने चपेट में लिया है, उसमे कुछ प्राकृतिक है तो कुछ मानव निर्मित. व्यक्ति ने पहले अपने समस्याओं को सुलझाने का कार्य किया और प्राकृतिक समस्याए बड़ते गयी. अभी मानव के पास दो प्रकार की समस्याए है. दोनों प्रकार के समस्याओं से निपटने के लिए उचित शक्ति की जरुरत होती है. एक दुसरे के सहयोग के बिना कोई वैश्विक समस्याए हल नही होगी. इसलिए वैज्ञानिक और सामाजिक विचारवंत सोच रहे है की कौनसी विचारधारा इस दोनों प्रकार के समस्याओं से राहत दे सकती? 
 
ज्यादातर देशों का बुद्ध की ओर रुख है. करीब डेड सौ देशों में बौद्ध फ़ैल चुके है. धर्मो का युग ख़त्म हो रहा और "धम्म" का युग आ रहा है. इव्होल्युशन यानि नैसर्गिक परिवर्तन और रिव्होलुशन यानि मानवी परिवर्तन, जिसे हम "क्रांति" कहते है. विश्व में सिन्धु सभ्यता भी एक महानतम् क्रांति रही है. उसके बाद विश्वव्यापी "धम्म" क्रांति का "जनतांत्रिक" दौर सुरु हुआ.

धम्मक्रांति को जानने के पहले सिन्धु सभ्यता और धम्म क्रांति के बिच का फासला भी ठीक से जानना जरुरी है. उसका सफ़र कैसे रहा? इस विषय पर आने से यह पता चलता है की, भारत में "हिन्दू धर्म" के पहले "सिन्धु सभ्यता" का दौर रहा, जिसके सबुत "हड़प्पा" और "मोहनजोदड़ो" शहरों के उत्खनन से साबित हुए है. वह प्राकृतिक आपदाओ में पूर्णतः लुप्त हुयी. बाद में सिन्धु नदी के तट पर विकसित हुए सभ्यता को "हिन्दू सभ्यता" कहा जाने लगा.

 

हिन्दू सभ्यता ही हिन्दू धर्म है, जो वेदों को प्रमाण मानते है. तथा उसपर पर विश्वास करते है, वह हिन्दू है. भारत में वैदिक सभ्यता का विकास हुआ. करीब एक हजार साल तक उसका प्राचीन भारत पर असर रहा. वैदिक सभ्यता का मुख्य आधार यज्ञ पूजा रहा. जो ईश्वर को खुश करने के लिए की जाती थी.

 

जिस घटना का कोई कारण पता नही होता उसे लोग भगवान की कृति समझते थे. ठीक उसी ढंग से प्राचीन काल के भारतीय जनता के दिमागों में खेल चालू था. जो श्रम करके अपनी उपजीविका करते थे उसे श्रमण कहा जाता था और जो श्रम करने से डरते थे, जो सिर्फ दिमागी कार्य ही करना चाहते थे, ऐसे आलसी लोगों को ब्रह्म (ज्ञानी) ब्राम्हण कहते थे.

भारतीय विख्यात इतिहास तज्ञ, नवल 'वियोगी' लिखते है, "पूर्व पाषाण युग के अंत में ईसा पूर्व- १०,००० के लगबग असभ्य मनुष्य के मस्तिष्क में विचित्र विकास हुआ और उसने नवीन पाषाण युग में प्रवेश किया....इसा पूर्व ६ सहस्त्राब्दी के मध्य में इसने कृषि करना सिखा...तथा उसी के साथ पशुपालन भी सुरु किया...मिट्टी के बरतन भी बनाने लगा...

 

इसा पूर्व ५ वी सहस्त्राब्दी के लगबग ताम्ब्र युग का प्रारम्भ हुआ...सिन्धु सभ्यता भी इसी युग के परिवार की सभ्यताओ मे से एक है. इसी युग की तिन प्राचीनम सभ्यताओं में "दजला फरात" नदी के किनारे "मेसोपोटामिया", "नील के किनारे "मिश्र" तथा "सिन्धु नदी" के किनारे "हड़प्पा" ने जन्म लिया और खूब फली-फुली....मोहनजोदड़ो का शब्दार्थ ही "मुर्दों का टीला" है ...इसमें सबसे ऊँचा "स्तूप टीला" है. उसकी ऊंचाई ७० फुट है...

 

सन १८५६ में मुल्तान-लाहोर रेल्वे लाईन १०० मील के हिस्से के निर्माण का काम करनेवाली अंग्रेज कंपनी के ठेकेदार "जेम्स विलियम वर्टन" ने ...सब से पहले यह पाया...की उपलब्ध वस्तुए १५००-२५०० इसा पूर्व की है." (सिन्धु-घाटी सभ्यता के सृजनकर्ता शुद्र और वणिक, सन- १९८५, भूमिका)

डॉ. भारत पाटणकर लिखते है, "इन्द्र इस ॠग्वेदीय नायक को "पुरम्दर" – शहरों को तोडनेवाला कहते है.... 'हरियुपिया' (हरप्पा) नगरी पर हल्ला करके उसे नष्ट करने का सबूत ॠग्वेद (६.२७.५) में (वधिदिन्द्रो वरशिखस्य शेषो अभ्यावर्तिने चायमानाय शिक्षन् | वृचिवतो युद्धरियूपीयांयोहन्पूर्व अर्धेभियसापरो दर्त ||) आया है....

 

जो सिन्धु सभ्यता के निर्माता थे, उनके शहरों को लुटा और उसे "दस्यु" (दास) कहा... "पनी", व्यापारी (वाणी) भी उनका नाम था. (हिन्दू की सिन्धु? सुगावा प्रकाशन, सन- १९९३).... डॉ. कुलकर्णी लिखते है, "ॠग्वेद में कुल १०२८ सूक्ते, उसे लगबग ३९० ॠषिओं ने लिखी. उसमे से कुछ सूक्ते महिलाओं ने भी लिखी है."  (दैनिक लोकमत, नागपुर, २६ अप्रैल २००७) ....

 

वेदों कृतियाँ के बारे में इतिहास तज्ञ, प्रा. मा. म. देशमुख लिखते है, "१९ वे शतक में लगबग २०० साल पहले ब्राह्मणों ने वेदों का गठन किया होगा." (बौद्ध धम्म आणि शिवधर्म, जुलाई- २००७, पृष्ट-७)

वैदिक धर्म का दूसरा नाम हिन्दू धर्म है. इस काल में समाज जितने वाले व्यक्ति या टोलियों को "आर्य" (श्रेष्ट) कहा जाता था. आर्य कौन थे? इसका साक्षात्कार सन १९४६ में, विश्व विख्यात प्रगाड़ विद्वान् डॉ. बाबासाहब आंबेडकर ने अपने "हूँ वेअर द शुद्राज?" संशोधन पर ग्रन्थ के '७ वे अध्याय' मे दिया है, "यह सिद्ध हो चूका है की, शुद्र अनार्य नही है. तो वे क्या थे?

 

उसका उत्तर है १. शुद्र आर्य है. २. शुद्र क्षत्रिय है. ३. शूद्रों का स्थान क्षत्रियों मे उच्च था, क्योंकि प्राचीन काल मे कई तेजस्वी और बलशाली राजा शुद्र थे. यह मत इतना अनोखा है की इसे लोग मानने कों तयार न होंगे. अतेव, अब प्रमाणों की जाँच की जाए. प्रमाण महाभारत, शान्ति पर्व, (६०, ३८-४०) मे है."

निसर्ग निर्मित भूकंप, भूचाल मे जैसे हालत बस्तियों की होती है, उसी प्रकार जमींन की उथल-पुथल हुयी है. ठीक वैसे ही प्रकार का परिणाम खुदाई में पाया गया. खुद डॉ. बाबासाहब अम्बेडकरने भी स्वीकार किया है की सिंधु संस्कृति पर किसी ने भी हमला नही किया और ना उनके पुक्ता सबूत मिले है.

 

मनगढ़ंत वेदों को प्रमाण मानकर वर्ण, जाती और धर्म के चाहनेवाले सिन्धु संस्कृति पर हमला होने का दावा कर रहे है, हम वेदों का भी विचार करे तो सुरु मे वेद तीन ही थे. चौथा वर्ण बाद मे बना. इसका मतलब वेद हमेशा विकशित होते गए, वेद का मतलब वेध या निचोड़ है.

सिन्धु सभ्यता का विनाश कृतिम कारणों से नहीं तो भूचाल जैसे नैसर्गिक कारणों से हुआ था. जो लोग विदेशी हमला उसका कारण मानते है, वे वंशवादी है, जो वंश के नाम पर मानव समाज में भेदभाव पैदा कर झगड़ा करना चाहते है और उसमे अपनी रोठी शेंकना चाहते है.

 

अगर बौद्ध साहित्य पढ़ते है तो पता चलता है की प्राचीन भारत में आर्य नाम का कोई वंश नही था, वह एक विशेषण है, आर्य का मतलब "श्रेष्ठ" है, न की वंश. इसलिए आर्य बनाम अनार्य, नाग, मुलनिवाशी संकल्पना मनगढ़ंत है. यह जातिवादी, हिन्दुधार्मीय, बामसेफ, बीएसपी, एम्बस, भारत मुक्ति मोर्चा का संशोधन बेबुनियाद है. वह केवल हवा पर निर्भर है, हकीकत पर नहीं.

मंगलवार, 9 जून 2020

बुद्धाची धम्मक्रांती : सफल कि विफल? - 8


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमीवर महायानी भिक्षु चंद्रमणी यांनी त्रिसरण आणि पंचशील दिले. हे विचार बुद्धाचे म्हणायचे कि भिक्षूंचे? ते बुद्धाचे म्हटले तर ते नंतर त्रिपिटकात का घुसडण्यात आले? जुण्या चार निकायात होते का? “त्रिशरण आणि पंचशील” म्हणजे “धम्म” का? परंतु बाबासाहेबांनी त्याच्या जोडीला नंतर “२२ प्रतिज्ञा” दिल्या. त्या प्रासंगिक होत्या. त्यात सुद्धा ‘बुद्धाला’ त्यांच्या ‘धम्माला’ शरण जाण्याच्या प्रतिज्ञा आहेत पण ‘संघाला’ शरण जाण्याची एकही प्रतिज्ञा नाही हे विशेष आहे. या “२२ प्रतिज्ञा”त हिंदू देवी-देवता व त्यांचे अवतार, उपासना व त्यांच्या रूढींना नकार म्हणजे धर्मांतर आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग, समता, पारमिता आणि पंचशील यांचा स्विकार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ५ जुलै १९४१ ला सायंकाळी मुंबईतील ‘सिद्धार्थ कालेजा’तील सभेत मनोगत व्यक्त केले, “बौद्ध धम्म हा तर्कावर अधिष्ठित धम्म आहे. या उलट हिंदुधर्माला तर्काची ओळख नाही. त्यांनी उदाहरणा दाखल सत्याचे विश्लेषण केले नाही. आपल्या इंद्रियांपैकी कोणत्याही एका अथवा अधिक इंद्रियाने एखाद्या वस्तूविषयी वा भावना विषयी साक्ष दिली तरच तेथे सत्याचा आविष्कार होतो, असे गौतम बुद्धाचे म्हणणे आहे. ज्या प्रसंगी इंद्रियाची साक्ष काढता येत नसेल त्या प्रसंगी सत्याऐवजी काहीतरी गुढ असल्याचे सांगण्यात येते. निस्वार्थपणे कार्य करीत राहावे हे बुद्धाचे मत असेल तर कोणीही ते कार्य का करावे? बुद्धाचे स्वतःचे मुळचे तत्वज्ञान व बुद्धाच्या मरणानंतर त्यांच्या शिष्यांनी भरती केलेले तत्वज्ञान यातील फरक प्रथम लक्षात घेतला पाहिजे, ज्याला इंग्रजीत Acquisitiveness (जास्त आधासिपणा) म्हणतात, तो दुर्गुण माणसांमध्ये जास्त असू नये, एवढेच बुद्धाचे म्हणणे होते.” (जनता दि.- ९ जुलै १९४९)
तसेच दिनांक ८ मे १९५५ ला नरेपार्क, मुंबई येथे भारतीय बुद्धजन समितीच्या वतीने बुद्धजयंती पार पाडण्यात आली तेथे बाबासाहेब म्हणाले, “बौद्ध धम्मामध्ये दोन (हीनयान व महायान) प्रकारचे लोक आहेत. या धम्माचे संशोधन करण्याचा माझा मार्ग नाही. माझे मुख्य कार्य प्रचार करण्याचे आहे. आम्हाला लोकांना बुद्धिष्ट करून घ्यावयाचे आहे, हेच माझे कर्तव्य होय.” (धम्मचक्र प्रवर्तनाय, संकलन- प्रदीप गायकवाड, पृष्ठ- २१४) त्यामुळे संशोधन न करता जो धम्म दिल्या गेला त्यात हिंदू विचारांची भेसळ राहिली आहे. तिला नाली काढून, दूर करून शुद्ध, आसील पाणी करण्याची त्यांची ईच्छा होती पण शरीर साथ देत नसल्याची सूचना त्यांनी वेळोवेळी दिली होती. एवढेच नाही तर “हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती” या मथळ्याखाली सन १९५० मध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले ते बघणे अति आवश्यक आहे, “ज्या मजकुराच्या आधारावर वादविवाद करावयाचा तो मजकूर मूळचाच आणि सत्य आहे कि तो नंतरच्या भिक्षूंनी घुसडून दिलेला आहे, हे ठरविणे, हा मुद्याचा प्रश्न आहे.
“बुद्धाच्या शिकवनुकीतील प्रमुख अंगे कोणती? याचे ज्ञान ज्याला आहे, त्याला सुत्तपिटक सद्याच्या अवस्थेत आहे, ते पाहून आश्चर्य वाटेल. सुत्तपिटक सध्या कोणत्या अवस्थेत आहे? बुद्धाच्या शिकवनुकीशी असबंध वाटणाऱ्या कल्पना आणि ब्राह्मणी विचारसरणीच्या पौराणिक कथा ‘बुद्ध देवा’च्या नावाखाली त्यात घुसडल्या आहेत. ब्राह्मणी मठसंप्रदायातील राहणीची अवास्तव वर्णने त्यात घालण्यात आलेली आहेत. ती राहणीच आदर्शमय होय, ती बुद्धधम्माची आदरणीय आचारपद्धती होय, हे सर्व भाषविण्यात आलेले आहे. सुत्त पिटकाचे सध्याचे विद्रूप आणि ओंगळ रूप पाहून ‘ऱ्हीस डेविड्स’ यांना आश्चर्याचा धक्काच बसला.... सुत्त पिटकाच्या पानापानात खरा गौतम दिसत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, खंड- ६, पृष्ठ- १४८, संकलक- मा. फ. गांजरे, नागपूर) ”असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. त्या भेसळीचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया.