मंगलवार, 9 जून 2020

बुद्धाची धम्मक्रांती : सफल कि विफल?













बुद्धाने संवादातून धम्म समजावला. धम्मप्रचारासाठी संवाद आवश्यक आहे. समजावण्याची दुहेरी पद्धत उचित आहे. भाषण आणि प्रवचन या आधारे धम्म विचार थोपले जातात. समजल्याची खात्री झाल्यावर लोक ते चांगले आहे, ठीक आहे, समजले, फार सुंदर अशी टिप्पणी करून जायचे. आता भिक्षु प्रवचन देतात. ते अनेकांना समजत नाही. न समजल्याची तक्रार करण्यासाठी भिक्षु
जागाच ठेवत नाही. भिक्षूला गुरु समजावे. त्यांनी काही न समजणारे विचार सांगितले तरी ते शिष्याने मुकाट्याने पाळावे, हा कसला धम्म प्रचार? यातूनच भिक्षु-भिक्षूंनी “सत्यनारायण कथा” अर्थात “परित्राणसूत्र पाठा”च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या धर्मांतराला, धम्मदीक्षेला कात्री लावत आहेत. बाबासाहेबांनी बुद्धधम्माचे बीज पेरण्यासाठी आजन्म शेती तयार केली. त्यात आता महायानी भिक्षु हिंदू धर्माचे पिक घेत आहेत. आज शेतीचे त्या शेतीचे रखवाल कोणी आहे का? आधुनिक विज्ञानावर आधारित धम्म वा धम्माला वैज्ञानिक आधारावर प्रचारित करण्याचा प्रयत्न किती भिक्षु करतात? अंगाववर चिवर पांघरून विश्वाची पुनर्रचना करण्याचा आव आणणे भिक्षूंनी सोडायला हवे, नाहीतर तसे करून तरी दाखवायला हवे.
समाजाने व्यक्तीला शरण जायचे कि विचारांना? व्यक्ती म्हणजे उद्दिष्ट नाही. व्यक्तींचे हित हे उद्दिष्ट आहे. व्यक्तींचा समाज होतो, समाज कल्याण कि व्यक्ती कल्याण? समाज कल्याण म्हणजे जाती कल्याण असा अर्थ घेवू नये. समाज जातीतीत आहे. अनेक समाजांचा देश व अनेक देशांचे विश्व मानले तर विश्वाची पुनर्रचना करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठले जाईल. व्यक्ती कल्याणातून हजारो वर्षापासून जगात भिक्षु आहेत आणि आतंकवादी, नक्षलवादी, भ्रष्टाचारी जगातील मानवी सुखाचा अंत करू पाहत आहेत. यात भिक्षुंचा प्रभाव मोठा आहे कि गृहस्थांचा? बहुजन म्हणजे समाज भिक्षूंनी समाजाला योग्य, उचित, समुचित, श्रेष्ठ, आदर्श, सम्यक, ‘बहुजन-हिताय, बहुजन-सुखाय’ संदेश दिला असता तर धम्मराज्य निर्माण झाले नसते का? भिक्षु हे जर गांधीसारखे टाटा-बिर्लांच्या ताटाखालचे मांजर बनले असतील तर काय फायदा?
बुद्ध कि कार्ल मार्क्स? यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला धम्म हि अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहित आहे कि कार्ल मार्क्स च्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांचा मताप्रमाणे “धर्म” म्हणजे काहीच नाही ज्यांना धर्माचे महत्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले. निवांत झोप मिळाली कि सगळ संपल. हे त्यांच तत्वज्ञान! मी त्या मताचा नाही, माझे वडील गरीब होते; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही म्हणून माणसाचे जीवन सुख-समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळी विरुद्ध मी नाही.
“आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच. पण मी यात एक महत्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोजू वैरण लागते. मानसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे कि रेडा व बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही, असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्यात मला काहीच कारण नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरव्ही मानव जातींचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही..... बुद्धाने सांगितले, जगात ९०% व्यक्ती दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसाना मुक्त करणे हे बौद्धधम्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा वेगळे असे कार्ल मार्क्स यांनी वेगळे असे काय सांगितले?” (नागपूरच्या दीक्षाभूमीवरील भाषण, दिनांक- १५ आक्टोंबर १९५६)
धर्मांतराच्या चळवळीतून नागपूरला धम्मदीक्षा नागपूरला घडली. यात ५ लाख गरीब, उपाशी उद्या पोटभर मिळेलच या आशेने लोकांनी बाबासाहेबांकडून दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी ते भुकेले राहू नये म्हणून जे प्रयत्न केले त्यातून फक्त १० % लोकांची पोटे भरली. उर्वरित ९०% लोक उपासीच आहेत. त्यांच्या पोटाला अन्न नसेल तर त्यांना बुद्धीची हालचाल कळेल का? बुद्धाने म्हटले, प्रथम उपाशी लोकांना ज्ञान नाही तर अन्न द्यावे. त्याला नंतर धम्म सांगावा. आता आपण कितीही भुकेल्या भारताला धम्म दिला तरी समजेल का? याचा सुज्ञ बौद्धांनी विचार करून धम्म प्रचाराला लागावे. तरच धम्माचा योग्य तो प्रभाव लोकांवर पडेल. बाबासाहेबांना अभिप्रेत आर्थिक लोकशाहीला किती काळ थोपवून धम्म प्रचाराचा गाढा समोर ओढता येईल? हा महत्वाचा प्रश्न आहे.
भुकेले लोग बौद्ध धम्म सोडून दुसरीकडे का भटकत आहेत? पोटासाठी कि उपशीपोठी धम्म न समजल्यामुळे? समाजाचे सर्व प्रश्न विचारात धम्म घेत होता पण आता त्याला फक्त संस्कृतीत बहिष्कृत करून कसे चालेल? धम्माला अर्थ, शिक्षण, सत्ता, आणि संस्कृती हे चारही प्रश्न सोडवत चालावे लागेल तरच सर्वांगीण समाज परिवर्तनाची गरज पूर्ण होईल. आज फक्त भरलेल्या ढेरपोट्या लोकांसाठीच धम्म ठरत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. आजचे आंबेडकरी बौद्ध धम्माला फक्त पोट भरलेल्या, चैन करणाऱ्या लोकांसाठी मर्यादित करीत आहेत आणि उपाशी लोकांकडून धम्म आचरणाची अपेक्षा करतात, हे कसे शक्य आहे? आधी धर्मांतर कि आर्थिक समस्या? त्यापैकी धर्मांतर झाले पण आर्थिक समस्या सुटली नाही. जातिगत आरक्षणाने सुटणारच अशी कोणीही शाश्वती पण देवू शकणार नाही. त्यामुळे धम्म घातकी उलट जातिवाद वाढेल.
buddha and karl marks -👇👇👇 
https://youtu.be/TYFqKjxIlBg

शनिवार, 30 मई 2020

जनतंत्र के लिए खतरा

पिछले सदी में २ विश्व महायुद्ध हुए. काफी जानमाल का नुकसान हुआ. तानाशाही के खिलाफ विश्व के कही देश एक हुए, जिससे विश्व के काफी देश तानाशाही से मुक्त हुए, जहाँ पर जनतंत्र बहल किया गया. भारत में अंग्रेजों के गुलामी से आझादी पाने के लिए संघर्ष चालू थे, भारत आझाद हुआ और भारत में भी राजकीय जनतंत्र बहाल किया गया.
डॉ बाबासाहब आंबेडकर महान बुद्धिमान व्यक्ति के रूप में वे उभरकर आये. आझाद भारत का संविधान लिखने के लिए उनका भी काफी समय व्यतीत हुआ, २ साल, ११ माह और १८ दिन में भारत का संविधान कांग्रेस के नेताओं के बहुमतों से बना. मगर बाबासाहब के मतानुसार उसमे कुछ खामिया रही. वह राजकीय जनतंत्र बहाली के योग्य रहा पर आर्थिक जनतंत्र बहाल करने में यह संविधान असफल रहा. जिसके वजह से गरीब और अमिर ऐसे दो गुठों में जनता विभक्त हुयी.
गरीब लोगों ने अपने विकास के लिए जातिगत आरक्षण को अपना हक समझकर स्वीकार किया पर उससे सभी गरीबों का विकाश नहीं हुआ. अभी भी भारत में गरीबों की हालात बहुत दयनीय है. कुछ लोगों ने आंबेडकर साहब के साथ बौद्ध धम्म को अपनाया, पर उससे भी गरीबी दूर करने के लिए कुछ मदत नहीं हुयी. कुछ लोग अपना जनतांत्रिक रास्ता भूल गए.
कुछ लोग जातियों के तानाशाही को अपने विकाश का रास्ता समझकर "बहुजन", व् "मुल्निवाशी" लहर में बह गए. कुछ लोगों को वह कम बिचमे ही छोड़ना पड़ा, क्योंकि उनमे तानाशाही हावी हुयी, संघटन में तानाशाही के काफी लोग शिकार हुए. और कुछ लोग मार्क्स वाद के माध्यम से अपनी गरीबी भगाने लगे, वे माओवादी नक्शली बने.
बहुजन लहर जातिवादी बनी तो कुछ लोग बगावती बने जिसमे से कुछ लोग माओवाद को बुद्ध धम्म समझ बैठे. हकीकत यह है की बुद्ध का रास्ता न जातिवाद का है और न मार्क्सवाद का. बाबासाहब ने जातिवाद और मार्क्सवाद से दूर रहने की हमेशा हिदायत दी थी.
बाबासाहब ने भाषण में स्पष्ट कहा था," विश्व के सामने, विशेषतः आशिया खंड में आज दो ही रास्ते बाकि है, एक बुद्ध का रास्ता और दूसरा मार्क्स का रास्ता. बुद्ध तत्वज्ञान का विश्व ने समय रहते हुए अंगीकार नही किया तो, कम्मुनिष्ट तत्वज्ञान का विजय होना तय है. बुद्ध का तत्वज्ञान यही विश्व को एकमेव आधार है. उसका प्रचार जितना ज्यादा होगा उतना ही विश्व युद्ध से वंचित रहेगा और शांति के करीब जायेगा."
मार्क्सवाद एक प्रकार की गरीबों की, मजदूरों की तानाशाही है. तानाशाही जनतंत्र के खिलाफ है, यह सोचकर बाबासाहब ने जनतंत्र के हिमायती बुद्ध को अपनाया, अपना गुरु कहा. तानाशाही फिर जाती की रहे या वर्ग की वह इंसानी हिंसा को बढ़ावा देती है, इसलिए बाबासाहब आंबेडकर ने हमेशा ब्राह्मणवाद और कम्मुनिष्ट विचारों का जमकर विरोध किया है.
जो लोग जनतंत्र में विश्वास करते है, उन्होंने जनतंत्र के रक्षा के लिए हमेशा आगे रहना चाहिए. काठमांडू, नेपाल के अपने प्रसिद्ध भाषण में भी उन्होंने "बुद्ध बनाम मार्क्स" साबित किया और भिक्षुओं को हिदायत दी थी की अगर विश्व में कम्मुनिस्ट (माओवाद) फैला तो उसके जिम्मेदार भिक्षु ही रहेंगे, ऐसा स्पस्ट कहा था.
न जातिवाद धम्म विचार है और न कम्मुनिस्ट विचार धम्म विचार है. जातिवादी लोगों और कम्मुनिस्ट द्वारा धम्म या आंबेडकर साहब से अपना रिश्ता बताने का प्रयास करना यानी उनका अपमान करना है. भारत सरकार ने भी जातिवाद के प्रचार को तथा कम्मुनिसटों  के विचारों को आतंकवादी विचार घोषित करना चाहिए, तभी ही देश में जनतंत्र की उचित रक्षा होगी.

सोमवार, 25 मई 2020

आंबेडकरी जनतेवर महायानी प्रभाव



                 गौतम बुद्धाचे विचार जगातील अनेक देशात वास करीत आहेत, असे अनेक विचारवंताचे मत आहे. परंतु बुद्धाचे नेमके विचार कोणते? ह्या बाबद मतभेद आहेत. महायान व हीनयान या मुख्य दोन संप्रदायांची विचारधारा जगात प्रसिद्ध आहे. या दोन पैकी कोणत्याही संप्रदायांचे समर्थन बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. पण याच संप्रदायांचे भिक्खू भारतात वावरत आहेत. त्यांनी बुद्धगया येथे आपले कार्यालये उभी केलेली आहेत. या कार्यालयाच्या अंतर्गत भारतात ते आप-आपल्या संप्रदायांचा प्रचार करीत आहेत. या भिक्षूंचे प्रमुख लक्ष्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाराष्ट्रातील लोकांना धम्म दीक्षा देवून बौद्ध बनविले आले. त्यांना भ्रमित करून आपल्याकडे ओढण्याचे कार्य चालू आहे.
                बौद्ध संप्रदायांच्या माध्यमातूनच त्रि-पिठ्कांची निर्मिती. या भेसळयुक्त मतांच्या ग्रंथांचा पुरावा देवून ते अनीश्वरवादी बुद्धाला ईश्वरवादी अर्थात “भगवान” बनविले. ज्याप्रमाणे हिंदू व इतर धर्माचे लोक ईश्वराची पूजा करून आशीर्वाद मिळवितात तसाच हा प्रकार आहे. या याचे समर्थन करतांना “त्रैलोक्य बौद्ध महासंघा”च्या महायानी महास्थवीर संघरक्षित यांनी “भगवान” या शब्दाची व्याख्या बनविली. त्यांच्या मते “भग = भागवणे” आणि “वान = Want = इच्छा, तृष्णा”. ज्यांनी तृष्णेचा, इच्छेचा समूळ नाईनाट केला तो “भगवान”. यांत प्रश्न येतो कि मराठी, हिंदी, संस्कृत व पाली भाषेत तरी “वान = ईच्छा, तृष्णा” असा अर्थ नाही. जर तसा अर्थ नसेल तर बुद्धाला अलौकिक, दैवी, देवासारखा वा त्यापेक्षा ही महान बनविण्याच्या नादात बुद्ध धम्मात “भगवान” अवतरला.
              दुसरा प्रश्न हा निर्माण होतो कि कोणता ही जिवंत व्यक्ती आपल्या संपूर्ण इच्छेचा नाईनाट करू शकतो का? इच्छा ह्या शारीरिक व मानसिक प्रकारच्या आहेत. त्या परस्परावलंबी आहेत. शरीराच्या ईच्छा मारल्या, संपवल्या तर मनाच्याही ईच्छा संपतात आणि मनाच्या इच्छा संपवल्या तर शरीराच्याही ईच्छा संपतात. कोणताही व्यक्ती जिवंतपणी आपल्या संपूर्ण इच्छेचा त्याग, अंत करू शकत नाही. यात त्यांना जिवंत बुद्ध हवा कि मृत हे कळायला मार्ग नाही. एखाद्या व्यक्तीला एवढे मोठे करण्याच्या नादात त्यांनी बुद्धाच्या वैज्ञानिक विचारांची ही तमा बाळगलेली दिसत नाही.
              महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या राखेला पवित्रतेचा मुलामा लावून त्यावर थडगे उभारले, त्याची पूजा करायला सुरुवात केली आणि कालांतराने बुद्धाच्या मुर्त्या बनवून त्यांची “पूजा” सुरु केली. बुद्धाची व त्यांच्या अस्थींची पूजा करणाऱ्या बौद्धांची परंपरा सुरु झाली. आज दोन्ही संप्रदायांच्या लोकांनी “पूजे”चा अंगीकार आणि प्रचार-प्रसार सुरु केला आहे. त्यातून “बौद्ध पूजा पाठ” नावांच्या भाकड परंपरेची निर्मिती झाली. आज वैज्ञानिक युगात “परित्राण सूत्र पूजापाठा”चा पांढरा धागा, दोरा आंबेडकरी बौद्धांचे रक्षण करीत आहे ! किती ही अदभूत विचारसरणी आहे जिला परंपरेच्या नावाने स्वीकारले जात आहे. ह्या आंधळ्या परंपरेला आजचा वैज्ञानिक वर्ग अंगीकार करतांना दिसतो तेव्हा त्यांच्या वैज्ञानिक धम्माची कीव येते.
               गौतम बुद्धाने “अनात्म”वादाचा सिद्धांत मांडून हे सिद्ध केले कि जगात “आत्मा” नाही. तरीही जबरदस्तीने महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या पूर्वजन्माच्या जन्मकथा, जातककथा रचल्या. पूर्वजन्मात चांगले कार्य केले असेल म्हणून तो या जन्मात सुख उपभोगतो व या जन्मात जो चांगले कार्य करील तो येणाऱ्या जन्मात सुखी होईल त्याच प्रमाणे जो या जन्मात “बोधिसत्व” आहे तो पुढील जन्मी “बुद्ध” होईल. या काल्पनिक विचारांचा परिणाम म्हणजे तिबेट “लामा” (बोधिसत्व) पद्धती.
              बुद्ध होण्यासाठी प्रथम “बोधिसत्व” होणे आवश्यक आहे म्हणजे जो पूर्व जन्मी बोधिसत्व असेल तोच “बुद्ध” होऊ शकतो. बोधिसत्व होण्यासाठी “दहा पारमिता”चे आजन्म पालन करावे लागते असा महायानी समज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या दहा पारामितांचे जीवनभर पालन केले आहे याचा शोध या महायानी भिक्षूंनी १४ आक्टोंबर ते ६ डिसेंबर १९५६ ला केवळ दोन महिन्यात लावला. त्याच शोधाच्या आधारे महायानी भिक्षु बाबासाहेबांना “बोधिसत्व” म्हणायला लागले. ज्या बाबासाहेबांनी आत्म्याचा पुनर्जन्म नाकारला त्यांच्या नावासमोर आत्मवादी संकल्पनेचा पुरस्कार करणारा शब्द लावून त्यांना “हिंदू” बनवून सोडले.
              बाबासाहेब आंबेडकर मरण पावले ही बातमी जगाच्या काना-कोपऱ्यात वाऱ्याच्या गतीने पसरली. लोक मुंबईत जमत होती. त्यात महायानी “भदन्त आनंद कौसल्यायन” सुद्धा होते. पाहता पाहता लाखोंची गर्दी जमत होती. हिंदूंच्या दहन घाटावर बाबासाहेबांच्या प्रेताला अग्नी देण्यात आली. त्यातून उरलेल्या राखेवर थडगे उभारले. त्याला महायानी परंपरेत “चैत्य” म्हणतात. चैत्य म्हणजे चितेवर उभारलेली वास्तू, जिथे चेतनेचा अभाव असतो. ते ज्या ठिकाणी उभारले आहेत त्या ठिकाणाला “चैत्यभूमी” (मुर्दा घाट) संबोधल्या जात आहे. तिथे बौद्ध उपासक दरवर्षी मोठ्यासंख्येने जमतात. हा प्रकार अवैज्ञानिक, विचार विरोधक, व्यक्तिवादी आहे.
              देवी-देवतांच्या मुर्त्या सुद्धा स्मारकाचेच कार्य करतात. मेलेल्या माणसात दैवत्व शोधून “घे भीमा, जन्म तू, पुन्हा-पुन्हा” म्हणत असतात. हि भावना काय दर्शविते? जागोजागी मेलेल्या लोकांची थडगे यांना “स्मारक” समजून पूजण्याची परंपरा चालू आहे. ही उपासना मागील हजारो वर्षापासून सुरु असून सुद्धा जगातील ९०% मानव समूह दु:खी का? आपण थडग्याच्या उपासनेतून आजवर काय कमावले?
             कार्ल मार्क्स हे धर्माला “अफू”ची गोळी समजत होते, ते काही मजाक म्हणून नव्हे. भारतीय महायानी बौद्ध भिक्षु सुद्धा भारतात “अफू”ची पेरणी करण्यात मागे नाहीत, मग ती जमिन बुद्धाची असो कि “बाबासाहेबाची.” त्याचा परिणाम बाबासाहेब आंबेडकर यांच्या “THE BUDDHA AND HIS DHAMMA” या ग्रंथाचे “भगवान बुद्ध और उनका धर्म” असे चुकीचे हिंदी भाषांतर आहे.
             बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. कार्ल मार्क्सचा “दास कॅपिटल” त्यांनी वाचला नसेल असे होवूच शकत नाही. म्हणूनच हिंदू धर्म सोडण्याआधी त्यांनी आपल्या ग्रंथात बुद्धाच्या विचारांना “धर्म” म्हणून स्वीकारण्या ऐवजी “धम्म” म्हणून स्वीकारले. धर्मात असलेला अवैज्ञानिक विचार त्यांनी काढून फेकण्यासाठी ईश्वर-आत्मा मानणार नाही व त्यांची उपासना करणार नाही असी सामान्य जनतेला प्रतिज्ञा दिली. लोकांनी ती ऐकली आणि दुसऱ्या कानातून सोडून दिली.
              सामान्य भारतीय जनता बुद्ध-भीम “वंदने”च्या माध्यमातून दु:खीतांचे दु:ख हरण करण्यासाठी वाट पाहत आहेत. ही वैज्ञानिक धम्माची अवैज्ञानिक दुरावस्था महायानी भिखुंच्या सानिन्ध्यातून आंबेडकरी बौद्धांना प्राप्त झाली आहे. व्यक्तिवादी बनण्याऐवजी विचारवादी व केवळ विचारवादी बनण्यापेक्षा कर्तुत्ववादी बनणे अधिक फायदेशीर आहे. शेवटी “हफीज जालंधरी”च्या शब्दांत म्हणावेसे वाटते, ”गल्त समझे यह बुद्धिमान गौतन की बसारत को, बलाए-बुत-प्रस्तीने बर्बाद किया भारत को.”