सोमवार, 1 जुलाई 2013

शाहू महाराज म्हणतात, "आर्य विदेशी नाहीत"... !


(कानपूर, उत्तर प्रदेश, येथील शाहू महाराज यांचा ऐतिहासिक भाषणातील काही भाग, दिनांक १९ एप्रिल, १९१९; पृष्ट- ८३४, ८३५ व ८३६)

"ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे नाव “आर्यावर्त” असे आहे. याला आर्यावर्त म्हणायचे कारण असे कि येथे प्रथम “आर्य” लोकांनी वसाहत केली. या देशाच्या रहिवास्यांना “आर्य” म्हणत असत. आर्याचे मूलस्थान “तिबेट” (त्रिष्टीत, तिब्बात). आर्य प्रथम दोन वर्णाचे होते. एक आर्यवर्ण आणि दुसरा दस्यूवर्ण. हे सर्व एकाच आईबापापासून जन्मलेले होते.

आर्यांच्या गुंकर्माचा स्वीकार करून दस्यू लोकांना आर्य होता येत असे. आर्य लोक दस्यूंचे गुणधर्म स्वीकारून “दस्यू” बनत असत. आर्यांची सामाजिक कार्य जसजसी वाढू लागली तसतशी ती करण्याकरिता चार वर्णाची स्थापना झाली. ‘निरुक्त’ मध्ये वर्ण शब्दाचा अर्थ “वर्णो वृनोति” अर्थात धर्मचरणाने खालचा वर्ण वरच्या वर्णात जावू शकतो. तसेच वरचा वर्ण अधर्म्चारणाने खालच्या वर्नाप्रत जातो. वैदिक काळापासून ते महाभारताच्या काळापर्यंत हि मर्यादा राहिली आहे.

वेदांचा सांगोपांग व समजून उमजून अभ्यास करणे, दुसर्यास शिकविणे, दुसरे यज्ञ आदिकरून कर्म स्वत: करणे व दुसऱ्याकडून लार्वोमे, तिसरी गोष्ट, दान घेणे आणि देने हे ब्राह्मकर्म.

शांती, मनोनिग्र, ताप, आतून व बाहेरून स्वच्छता, क्षमा, सरळपणा, ज्ञान, विज्ञान (ईश्वर, जीव, प्रकृती यांचे ज्ञान) यांचे आस्तिक्यभाव हि ब्राह्मणांची कर्मे होत.

प्रजेचे रक्षण करणे, प्रजेच्या कल्याणाकरिता दान देणे, होम करणे, वेदांचे पठण करणे, युद्ध करणे, निर्भयपणे राहणे, धर्यवान होणे, युद्धात चार्तुर्य, विषयात न रमणे, न फासणे, युद्धातून परत न फिरन, प्रजेच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणे, ईश्वरावर दृढ विश्वास ठेवणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्तव्य होय. 

जनावरे पाळणे व त्यांची वाढ करणे, दान देणे, यज्ञादी कर्म करणे, वेदाचे सांगोपांग अध्ययन करणे, देशाबाहेर जावून व्पायार करणे, सावकारी करणे, शेतकी करणे, हे वैश्याचे कर्तव्य आहे.

शिल्पकलेचे ज्ञान मिळविणे व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या कामात मदत करणे हे शूद्रांचे कर्तव्य होय.

वैदिक काळात अशाप्रकारची स्वतंत्रता होती कि जो कोणी एखाद्या वर्णाचे कर्तव्य करी त्याला त्या वर्णात सामील करून घेतले जाई. वेद काळात शास्त्रांचा अभ्यास करण्यास प्रत्येक स्त्री-पुरुषास अधिकार होता. वैदिक काळात सर्व वर्गाचे लोक वृशी झालेले आहेत. जोपर्यंत स्त्रिया मंत्र जाननाऱ्या होत्या तोपर्यंत आर्यावर्त स्वर्गाप्रमाणे होता. स्त्रियांनी व शूद्रांनी वेद वाचू नयेत.

कल्पित श्रुतीचा आवाज आकाशातून सुद्धा काढू देत नसत. त्यावेळी वर्ण व्यवस्था वंशपरंपरा रजिस्टर झाली तेव्हा एका वर्णाच्या मनुष्यांनी दुसऱ्या वर्णाचे काम करणे कठीण होऊ लागले आणि लोक आपल्या वर्णातील कर्तव्यापासून हळूहळू मुकु लागले. समाजाची घडी बिघडू लागली. शेवटी जी वर्णव्यवस्था ‘गुणकर्मावर’ आधारित होती ती ‘जन्मावर’ येवून बसली.

याप्रकारचे नियम करून त्याविरुद्ध कोणाची ‘ब्र’ काढण्याची छाती होवू नये, म्हणून ते ‘स्मृती’मध्ये घुसडून दिले.

वर्ण व्यवस्था जन्मावर आहे म्हणावे, दुसऱ्या कोणालाही ब्राह्मण म्हणता काम नये. तसेच ज्यांचे आईबाप क्षत्रिय तोच क्षत्रिय, मग त्यांच्यात गुण असोत कि नसोत. ज्यांचे आई-बाप वैश्य तोच वैश्य. ज्यांचे आई-बाप शुद्र तो शुद्र, मग त्यांच्यात कितीही प्रतीचे गुण असोत. जे जुने ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य गुणकर्मावरून श्रेष्ठ होवून जन्माचा अभिमान जसजसे धरू लागले तसतसे नव्या मनुष्याला ब्राहमण, क्षत्रिय, वैश्य होतानसे झाले. या पद्धतीच्या योगाने हिंदूंची जी अधोगती झाली ती इतिहास वाचकाला पूर्ण अवगत आहे. 

याच समयी चार वर्णाच्या पाच हजार जाती झाल्या. यामुळे हिंदूंचे सामाजिक बळ र्हास पाऊ लागले. प्रत्येक जात दुसऱ्या जातींशी खाणे-पिणे करीत नसून लग्न संबंध हि करीत नाही. एका जातीवर अन्याय झाला तर दुसरी जात डोळे उघडे ठेवून पाहत राहते. त्याबद्धल तिला थोडीही दया येत नाही. खरोखर मानवी प्राण्यांची एकच जात आहे. जातींचे लक्षण हे शास्त्र्कारांंनी लिहून ठेवले आहे."

बाबासाहेब आंबेडकर यांच्या "हु वेअर दी शुद्राज?" मधील आर्य विएशी नाहीत आणि शाहू महाराज यांच्या विचारात साम्य आहे. पण बामसेफ म्हणते की ते विदेशी आहेत, तर त्यांनी आपली भुकिका स्पष्ट करतांना अम्बेडकर व् शाहू यांच्या विचारांना प्रथम खोडून काढण्याचे धारिष्ट करावे, अन्येथा ते बाळ गंगाधर तिलक यांचे भक्त आहेत, हे सिद्धि होइल.

बीएसपी जनतांत्रिक नही, तो तानाशाही पार्टी है ...!

भारत में हिन्दुधर्म को माननेवाले जादा लोग है जो ईश्वर का प्रसाद समझकर जाती प्रथा का पालन करते है. जबतक उनके दिमाग से ईश्वर का डर नहीं निकला जायेगा, तबतक वह जाती प्रथा का पालन करेगा, राजनेता चाहते है की हमें सिर्फ उनके वोटों से मतलब है, हमारा काम हुआ की सबका काम हो ही जायेगा. क्या राजनेता का काम ही जनता का काम है? राजनेता भ्रस्टाचार द्वारा धन जमाते है तो वह देश के जनता में बंटते है? जाती भगवान ने बनाई है, उनका पालन नहीं करेगे तो भगवान कोप जायेगा और हमारा नुकसान करेगा, यह हिन्दुओ की धारणा है.

उनके धरना को बिना सुधारे उनसे यह अपेक्षाए नही कर सकते की उन्होंने उंच या नीचता की भावनाए त्याग दे. बामसेफ/ बीएसपी को हिन्दुओं के आधारपर टुकड़े पसंद है पर धर्म को बिना सुधारे ही जातिवाद केवल पुलिश के डंडे द्वारा सुधर जाए. शिक्षानीति में धार्मिक मुद्दों को नही शिखाया जाता और न उनकी चिकिस्ता की जाती है. विद्यार्थी उच्च शिक्षित होने के बाद भी मंदिर सिढिया चढ़ने में महानता महसूस करते है. 

हिन्दुओं जाती के नामपर बीजेपी और बीएसपी हमेशा ठगती राहती है इसलिए उनके विकास में रोड़ा है. हिन्दुओं के धार्मिक, देवी देवताओ के  आस्थाओं को देखकर ऐसा लगता है की उन्होंने ली शिक्षा बेतुकी है, अवैज्ञानिक है. उनके शिक्षा का न उनके लिए कुछ फायदा है और न देश के लिए. उन्हें जबतक अंधश्रद्धा मुक्ति की शिक्षा जबतक बहाल नही की जाती है, तबतक जातिवाद, पूजापाठ, मंदिरों का दर्शन, आशीर्वाद, कृपा, स्वर्ग, नरक, राशिभविष्य, भेदभाव जारी रहेगा. 

क्या बीएसपी का शासन उत्तरप्रदेश में होने के बाद उन्होंने हिन्दुधर्म भावना सुधार शिक्षा अभियान चलाया था? अगर चलाया होता तो जातिगत भेदभाव के घटनाओं को लगाम लगी होती, पर वैसा नहीं हुआ. खुद दोषी होने के बाद भी दूसरों को दोष देने में कतै बुद्धिमानी नहीं है. हमारे हातों में सत्ता दो हम यह करेंगे, वह करेंगे के वादे लोगों ने अभीतक बहुत सुने पर बीएसपी के सभी वादे खोखले नजर आए. बीएसपी झूटी, ठग, भ्रष्टाचारी, जातिवादी, ईश्वरवादी, सांप्रदायिक पिछड़े हिन्दूओं की पार्टी है. 

जो जनतंत्र के नामपर धब्बा है. उनमे और अन्य नामी पार्टियों में बहुत बडा फरक नहीं है. अन्य पार्टियों से एह जरा ज्यादा ही बुरी है, क्योंकि यह पार्टी तानाशाही विचारों के आधारपर पार्टी का मुखिया चुनती है, पार्टी में जनतांत्रिक विचारों का अभाव है. बीएसपी जनतांत्रिक राजनीती में बहुत बड़ा काला धब्बा ही नहीं है, तो कलंक भी है.

शनिवार, 29 जून 2013

शाहू महाराज आणि त्यांची बहुजन चळवळ


शाहू महाराज हे आर्य (वंशवादी), क्षत्रिय वर्नाभिमानी आणि ईश्वरवादी कसे होते हे सिद्ध करण्यासाठी खालील पुरावे पुरे आहेत. खंडेराव गणपतराव कालेकर हे आपल्या “सत्यशोधकांचा वेद” मथळ्या अंतर्गत लिहितात, “(ज्योतीराव फुलेंची) सत्यशोधक चळवळ जशी धार्मिक आहे, तशी (शाहू महाराजांची) ब्राह्मणेतर चळवळ नाही. जे लोक सत्यशोधक नाहीत, त्यांना ब्राह्मणेतर चळवळीत भाग घेता येतो. सत्यशोधक चळवळीत ब्राह्मण चालतो पण ब्राह्मणेतर चळवळीला त्यामार्गाने बंधने आहेत.... सत्यशोधक चळवळीत अहिन्दुंचा प्रवेश दुष्कर. ब्राह्मणेतर चळवळीत अहिंदू चालतात. ब्राह्मणेतर चळवळ हि राजकीय चळवळ आहे. हिंदू समाजाची वर्णव्यवस्था बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा नष्ट करण्याचा तिचा उद्धेश नाही.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, पृष्ठ- ४३९, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, प्रकाशन- जानेवारी २००१)

• १९२० मध्ये शाहू महाराज यांनी “शिवाजी क्षत्रीय वैदिक शाळा” काढली. याचा अर्थ आर्य समाजाच्या सहिष्णुतावादी विचारांचा त्यांच्यावर होता. वेदातील वर्णवाद अर्थात “क्षत्रिय” वर्ण यांच्याप्रती त्यांच्यामानात प्रेम होते. पण त्याच वेदांनी भेद निर्माण निर्माण करून पुढे जाती आणि अश्पृश्यता दिली ती अयोग्य नव्हती का? शाहू सुधारक होते पण वर्णवादी हि हे कोणताही इतिहासकार नाकारू शकणार नाही. त्यांनी महारांना सांगिलते कि भीमराव हा तुमचा उद्धारकर्ता आहे, ते सिद्ध हि झाले पण अन्य अस्पृश्य जाती सुद्धा जातीवादी मानसिकतेत गुर्फडून राहिल्या आणि त्या बाबासाहेब आंबेडकर सोबत गेल्या नाहीत, त्यांनी धर्मांतर केले नाही. याचा अर्थ हा होतो कि सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ ह्या खऱ्या क्रांतिकारी नवत्या तर त्या जातीवादी चळवळी होत्या हे सिद्ध होते. त्यांचे आंबेडकरी प्रेम हे दिखाऊ होते हे आता लपून राहीले नाही.

• शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचा विधी हा वैदिक नसून “पुराणोक्त”च होता, त्यामुळे ते क्षत्रिय नसून शुद्रच होते. पण वर्ण व्यवस्थेच्या ते विरुद्ध नव्हते हे सिद्ध होते. शाहू महाराज म्हणतात, “मी छत्रपती आहे. अठरापगड जाती माझे प्रजाजन आहेत. माझ्या सर्व संस्थांच्या प्रजाजनांना नोकऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे. कोणतीही एकजात वरचढ होता उपयोगी नाही.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, पृष्ठ- ४२७, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, प्रकाशन- जानेवारी २००१) यात सुद्धा ते जातींचे सामाजिक महत्व मान्य करतात पण त्यांना नष्ट केले पाहिजे, अशी भूमिका त्यांची दिसत नाही.

• रुकडी काम्पहून शाहू महाराज यांनी लंडनच्या फ्रेजर यांना दिनांक २७ मे, १९२० रोजी जे पत्र लिहिले त्यात त्यांनी ‘ईश्वरावर त्यांचा विश्वाश होता’ हे सिद्ध करण्यासाठी पुरे आहे. त्यात ते लिहितात, “मी मांडलिक राजा असलो तरी मी प्रथम माणूस आहे, मला माणसातच राहावे लागेल. विशेषतः ज्या लोकांनी मला माझ्या अडचणीच्या वेळी मदत केली त्यांना कसे टाकावे? ब्राह्मणांना मला बदनाम करून राज्य करणे अशक्य करावयाचे आहे. त्यात ते यशस्वी झाले नाही तर – They will kill me by throwing a bomb at me.’ “गरज भाषल्याशिवाय मी जाहीर भाषणे करत नाही.” निराशेच्या स्वरात शाहू महाराज लिहितात, “My God help me in retiring without my loss of reputation.” (राजर्षी शाहू छत्रपती स्मारक ग्रंथ, प्रकाशन- जानेवारी २००१, पृष्ठ-५३०) 

• इतिहासाचे जातीवादी विश्लेषण होऊ नये तर वास्तववादी व्हावे, अन्यथा त्या विश्लेशनाला जातीवादी म्हणून ठपका लागेल आणि भविष्यकालीन इतिहास संशोधक उचित निश्कर्षाप्रत जाणार नाही. शाहू महारांचा उदोउदो करतांना त्यांच्या पुरांणपंथी विचारांची हि दखल घेणे, हे सुद्ध विचारवंतांचे लक्षण आहे. कोणाला किती डोक्यावर घेणे हितावह आहे, हे चुकीच्या किंवा भावनिक आधारावर मांडलेल्या विचाराने सिद्ध करता येत नाही. 

• एखादा व्यक्ती राजा होता म्हणून त्याला अवास्तव डोक्यावर घेवून नाचवायचे आणि दुसरा रंक होता म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा काही बुद्धीजीवी विचार नाही, तर तो भेदभाव आहे. राजेशाही म्हणजे लोकशाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध हे लोकशाहीवादी होते कि राजेशाही? बुद्ध-आंबेडकर वैदिक विचारांचे विरोधक होते पण साहू महाराज तसे होते का? 

• बाबासाहेबांचा विचार हा व्यक्तिवादी नव्हता पण शाहू महाराजांचा होता. सहानुभूती पोटी महाराजांनी बाबासाहेबांना आणि त्यांच्या कार्याला मदत केली, पण बाबासाहेबांनी त्यांच्याजवळ आपली बुद्धी गहाण ठेवली नव्हती. ते परस्परांचे मित्र होते पण मर्यादा सुद्धा कमी नव्हत्या. हिंदू विचारांच्या राजांना तथागत बुद्धासोबत एकत्र बसविणे, कितपत संयुक्तिक आहे? तसे तर संघपरिवार करीतच आहे, मग बौद्धांनी त्यांचासोबत जायचे का?

• बामसेफ/ बीएसपी केवळ राजकीय समीकरण बनवून जबरदस्तीने जातीवाद्यांना एकत्र करीत आहेत, त्यांचा वाटेने गेल्यास धम्म विचारांना भ्रमित केले जायील आणि जातीवादी सत्ता म्हणजे नीती, धम्म मानला जायील. ज्या दिवशी असे झालेले असेल, त्या दिवसापासून आंबेडकरी धम्म रसातळाला जायील.