शनिवार, 15 जून 2013

घटना : ईश्वरीय कृति कि कार्यकारण सिद्धांत?


बौद्ध, धम्मधारी लोक नेहमीच, सततच गरिबीत राहिले तर ते केव्हाही मार्क्सच्या साम्यवादाचे सैनिक बनून, बुद्ध धम्माला “अफू” समजून संपुष्टात आणतील. तसे प्रयत्न नक्षलवादी लोकांकडून चालू आहेत. 'नक्षलवाद' भारतात का आला? तर त्याची कारणे धम्म समजावून सांगण्यास बौद्ध लोक मागे पडलेत, हि आहेत. ‘’चैन” आणि “गरिबी” बुद्धाला व बाबासाहेबांना नको होती पण बौद्ध त्याला बळी पडले. बौद्धांच्या आचरणातूनच धम्म दिसायला पाहिजे पण तो दिसतो का? जर हजारो वर्षापासून चालत आलेली भिक्षूंच्या “महायानी” हिंदू, अवैज्ञानिक विचानाची भेसळ नष्ट झाली नाही तर नक्षलवादी लोकांना कोणता शुद्ध धम्म विचार द्यायला हवा? बाबासाहेब सामान्य लोकांना नियम आणि असामान्य लोकांना तत्वज्ञान सांगू ईच्छित होते. म्हणून त्यांनी विहारासोबत वाचनालय असावे असा विचार मांडला पण किती विहारात तो वास्तवात उतरला? विहारे बनलीत पण त्यात वाचनालये नाहीत पुजापाठेचा धम्म नव्हे तर धर्म फोफावला.


बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या बाजू ने उभे दिसतात. त्यांच्या मते बुद्धाचा धम्म मार्क्सच्या हमल्या पासून दूर आहे. मार्क्सच्या हमला वैश्य रुपी व्यापाऱ्यांवर आणि ब्राम्हणी पुरोहीतशाहीच्या धर्मावर आहे. व्यापारातील साधने ही सार्वजनिक असावित पण भारतात तसे नाही आणि धर्म हा अवैज्ञानिक विचारांवर आधारित आहे. बुद्धाचा धम्म हा धर्म नाही कारण त्यात आत्मा, ईश्वर, यांना स्थान नाही. तरी पुनर्जन्म आणि बौद्ध पुजापाठ यांचे समर्थन बाबासाहेबांनी केले कि नाही? विज्ञान म्हणतो कि वस्तू बदलतात पण जन्म घेत नाहीत व मृत्यूही पावत नाही पण "पुनर्जन्म" म्हणजे, पुन्हा-पुन्हा जन्म घेणे वा होणे. पेटत्या ज्योतीचा आधार घेवून दुसरी ज्योत पेटविणे, आंब्याच्या कोई पासून झाड बनणे, आई-वडिलांपासून पुत्र होणे म्हणजे पहिल्याचा दुसरा पुनर्जन्म होय, अशी मानण्याची प्रथा आहे. पण पहिला हा दुसऱ्या सारखा (जसाचा तसा) कधीच राहिला नाही. एवढेच कशाला मुळ पहिला सुद्धा क्षणोक्षणी बदलत राहिला आहे. तेव्हा कोणत्या बदलाचे दुसरे हे नवीन रूप म्हणजे पुनर्जन्म मानायचे? भौतिक पदार्थाचे अर्थात चार महाभूतांचे रूप, बदलत असते. त्याला पुनर्जन्म या संज्ञेत बांधता येईल का? 

व्यक्ती जिवंत असतांना काल सारखाच आज नाही, आज सारखाच उद्या राहणार नाही. अर्थात कालचा आज नाही व आजचा उद्या नसणार तर तो मेल्यावर, त्याला गाडल्यावर वा जाळल्यावर तो पूर्वीच्या जिवंत व्यक्तींचा वा त्याच अवशेषांचा दुसरा जन्म कसा मानता येईल? पुनर्जन्म ही संकल्पना भारतात बुद्धाच्या आधीपासून हिंदू धर्मात ब्राम्हणांनी पोसली. शरीर मरते पण आत्मा मरत नाही. महायानी काय म्हणतात? चार महाभूत मरत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू हे मरत नाही तरी त्यांचा पुनर्जन्म होतो. पूर्वीच्याच जीवाचा वा चार महाभूतांचाच दुसरा जीव, जन्म होतो का? 

आत्म्याचा पुनर्जन्म होत नाही पण भौतिक पदार्थांचा होतो ही दोन्ही मते अवैज्ञानिक, अज्ञानी नाहीत का? पहिल्याच्या लयानंतर होतो जन्म म्हणजे निर्मिती, यातील लय व उदय हे अवैज्ञानिक असत्य आहे. वे त्यांच्या अनित्य विचारला हे, विचार विज्ञानाला आणि बुद्धाला मान्य नाही. बुद्धाने “अनित्य” मानले, कार्यकारण परंपरा मानली. चार महाभूतांचा पुनर्जन्म होतो हे विचार अवैज्ञानिक असून ते महायानी भिक्षूंचे आहेत, ते बुद्धाचे नाहीत. बौद्धांना भ्रमित करण्यासाठी महायानी हिंदुनी ते धम्मविचार म्हणून घुसडले. त्यांना कवटाळून कोणाचाही फायदा नाही. पण त्याचा फार मोठा बाहु करून मृत भौतिक मानवी अवशेषांवर “चैत्य” उभारण्याला त्यांनी धम्म समजले. बुद्धाच्या दातावर, केसावर, नखावर, अस्थीवर विहारे उभारण्याची व त्यांची पूजा करण्याची रीत पुढे आली. भौतिक अवशेषांची पूजापाठ करणे म्हणजे बुद्धाचा “मध्यम मार्ग” आहे का? ह्या स्तुप, चैत्य पूजेच्या महाअंध:श्रद्धेतून जगाची पुनर्रचना लोकशाहीच्या नैतिक मुल्यांवर करता येईल का? हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धाने “कार्यकारण सिद्धांत” सांगितला त्याला “प्रतीत्यसमुत्पाद” हे शीर्षक भिक्षूंनी दिले, बुद्धाने नाही. ह्या कारणाने ते होते. ते असल्याने हे होते, हे नसेल तर ते होत नाही, हे बुद्धाचे मत होते. जुन्याचे नवीन रूप आहे, असे बुद्धाने सांगितले नाही. बुद्ध धम्मानुसार कोणतीच वस्तू जन्म घेत नाही व मृत, नष्ट होत नाही. सर्व वस्तू “अनित्य” आहेत. सर्व वस्तू परिवर्तनशील आहेत. परिवर्तनातून नवीन वस्तूला जन्म, निर्मिती म्हणणे हे भिक्षूंनी ठरविले. बुद्धाने त्यालाही अनित्य मानले. स्थिर वस्तूला नावात बांधता येते पण अस्थिर गतीशिलतेला जन्म, पुनर्जन्म या नावात बांधता येत नाही. म्हणून बुद्धाच्या “ह्या मुळे हे होते” या विचारला उत्पत्ती व लय (विनाश) च्या विचारातून सिद्ध करता येत नाही.

“कार्य-कारण सिद्धांता”ला प्रदुषित करण्यासाठी महायानी भिक्षूंनी त्याला प्रतीत्यसमुत्पाद हे नाव दिले. प्रतीत्य म्हणजे प्रत्येय, कारण, हेतू. सम्मु म्हणजे समूह. प्रतीत्य सम्मु म्हणजे प्रत्येय, हेतू, कारणांचा समूह. तर त्पाद म्हणजे उत्पाद, निर्मिती, जन्म. कारणांच्या सामुहिक प्रयत्नातून कार्य यातून बुद्धाला नवीन निर्मिती वा उदय हा अर्थ अभिप्रेत नव्हता तर अनित्य, परिवर्तनीय घटना, कार्य असे अभिप्रेत होते. पूर्वीचा जन्म आज नाही, आजचा जन्म उद्या नाही म्हणजे “सर्व अनित्य”, अस्थिर, बदलत, परिवर्तीत होत आहे. महायानी भिक्षूंनी बुद्धाच्या विचारणातून नव्हे तर हिंदू मानसिकतेतून “महायानी” भिक्षूंनी “पुनर्जन्म” मानला.

बुद्ध, धम्म आणि त्यांचा संघ


र्य अष्टांगिक मार्गातून एकही मार्ग उना केला तरी धम्म समजता येणार नाही, एवढे ते महत्वाचे आहेत. बाबासाहेबांनी पुढे लिहिले, “सम्यक दृष्टी विकसित करणे याचा अर्थ ‘प्रतीत्य समुत्पादा’च्या “कार्यकारण भावा”ला विकसित करणे होय.” (बुद्ध आणि त्यांचा धम्म; ४:४: सद्धधम्म, १:४)

(१) सम्यक दृस्टी- सम्यक म्हणजे उचित, श्रेष्ठ, परम आदर् आणि दृष्टी म्हणजे दृष्टीकोन, विचार, तत्वज्ञान ही सम्यक विचारांतील प्रथम पायरी आहे. त्यात “कार्यकारण सिद्धांत” म्हणजे “ह्या चे कारण हे आहे”. “ह्या मुळे हे होते”, “हे असेल तर ते होते,” पण “हे नसेल तर ते होणार नाही,” याचा बोध केला आहे. ते क्रमश: परस्परावलंबी, परस्परपूरक असून ते विचार धम्म राज्याला पूरक आहेत.
* अज्ञान * संस्कार * विज्ञान * नामरूप * षडायतन * स्पर्श * वेदना * तृष्णा * उपादान * भव * जन्म * उपायास ह्या एकूण १२ अंगाचा अर्थ अज्ञानामुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतणामुळे स्पर्श, स्पर्शामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपदानामुळे भव, भवामुळे जन्म आणि जन्मामुळे उपायास अर्थात रोग, दुःख, निर्माण होते. दुःखाचे कारण केवळ एकटीच तृष्णा नसून इतर ११ अंगेही आहेत.
(२) सम्यक संकल्प- सम्यक दृष्टी प्रमाणे उचित निश्चयाचा सतत अंगीकार.
(३) सम्यक वाणी- सम्यक संकल्पा नुसार उचित संवाद सतत उपदेश.
(४) सम्यक कर्म- सम्यक वाणी प्रमाणे उचित कार्याचा सतत वर्तन.
(५) सम्यक आजीविका- सम्यक कर्मा नुसार उचित सदाचाराची सतत कामना.
(६) सम्यक व्यायाम- सम्यक उपजीविके प्रमाणे उचित प्रयत्नांची सतत सवय.
(७) सम्यक स्मृती – सम्यक व्यायामा नुसार उचित आठवणीची सतत जागृती.
(८) सम्यक समाधी- सम्यक स्मृती नुसार “उचित चित्ताची एकाग्रता”. ज्यातून धम्मराज्य म्हणजे विश्वाची पुनर्रचना होईल.

बुद्धाचा धम्म आदर्श लोकशाहीच्या निर्मितीसाठी कार्यरत प्रयत्न होता. त्यामुळे वर्णवादी लोकांचा समाजातील मान-सम्मान अपमानात बदलला. काही ब्राह्मणवादी लोक चिडले आणि बदला घेण्याच्या उद्धेशाने काहींनी संघदिक्षा घेतली. त्यातून मान-सम्मान मिळाला आणि धम्माला पोखरण्याचे कार्यही सुरु झाल्याचे समाधान मिळाले. बुद्ध धम्मात बहुसंख्य भिक्षु ब्राह्मण वर्गातील होते. म्हणूनच त्यापैकी काही अप्रामाणिक, कपटी निघाले. जे बुद्ध वचनाऐवजी आपली वचने बुद्धवचन म्हणून समाजात प्रचलित करीत होते. तशाप्रकारच्या तक्रारी बुद्धाजवळ आल्या असता त्यांनी धम्मवचनाला तर्कबुद्धीने तपासूनच अंगीकारण्याच्या सूचना केल्या.

बुद्धाच्या हयातीत काही भिक्षु बुद्धाला चमत्कारी पुरुष, गुढज्ञानी समजत होते. म्हणूनच किसा गौतमी आपल्या मेलेल्या मुलाला जीवंत करण्यासाठी बुद्धाजवळ आली होती. त्यामुळेच भिक्षु आनंदाने बुद्धाच्या अंतिम समयी "चमत्कारी" विचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व भिक्षूंच्या उपस्थितीत विचारले होते कि, काही विशेष (गुप्त) संदेश असेल वा उत्तराधिकारी नियुक्तीचा त्यांचा विचार असेल तर तो त्यांनी सर्वांसमोर (भिक्षु संघासमोर) व्यक्त करावा.

त्यावर बुद्धाने सांगितले कि “जनतेच्या हिताचा कोणताही संदेश मी द्यायचा बाकी ठेवलेला नाही. जो आवश्यक होता तो वेळोवेळी सर्व दिलेला आहे. माझ्या पश्चात भिक्षूंच्या विनायासंबंधी विवाद महत्वाचा नसून धम्मासंबंधी विवाद झाला तर तो संघांने एकत्र बसून अंतिम निर्णय होत नाही तोवर चर्चा करून “बहुमताने” सोडवायला पाहिजे. यानंतर धम्मच भिक्षु संघाचा व उपासकांचा आदर्श असेल.” (तथागत बुद्धाने या महत्वपूर्ण संदेशात "विपस्सनेचा" सन्देश दिला नव्हता, पण जर कुणाला माहिती असेल की त्यात विपस्सनेचा सन्देश सुद्धा सम्मिलित होता, तर तो त्यांनी जन प्रबोधनासाठी सादर करावा.)

बुद्ध, धम्म आणि विज्ञान

थागत बुद्धाने मात्र सुखासाठी प्रेमाचा आधार घेतला. पैशासाठी वा उत्पादनांच्या साधनांसाठी भांडू नका. कामवासना करा पण त्याच्या आहारी, अधीन जाऊ नका. त्याशिवाय सुद्धा जीवनात इतर सुखे आहेत. परस्पर सहयोगातून जगाची पुनर्रचना करण्यासाठी जीवन खर्च करा, असा होता. कार्ल मार्क्स रक्तरंजित क्रांतीचे समर्थक होते पण बुद्ध तसे नव्हते. रक्त सांडवून हुकुमशाहीची निर्मिती होईल पण लोकशाहीची नाही. हुकुमशाही ही जनतेवर थोपवली जाते पण लोकशाही ही स्वयं स्फूर्तीने अंगिकारली जाते. बाबासाहेबांना पीडितांची सुद्धा हुकुमशाही मान्य नव्हती हे त्यांच्या “बुद्ध कि कार्ल मार्क्स?” या भाषणातून विषद होते. व्यक्ती भुकेला असेल तरी चालेल पण तो गुलाम नको, या विचारांचे बाबासाहेब होते म्हणून त्यांनी “राज्य-समाजवादाचा” सिद्धांत त्यांनी भारतापुढे मांडला पण थोपला नाही.

शरीरात आत्मा कुठे आहे? आत्माचे, स्वर्गाचे विचार वैज्ञानिक आहेत का? सूर्यापासून पृथ्वी बनली असा शोध लागला. सूर्याचा आकार ६,३६०,८० किमी एवढा प्रचंड आहे. तो गरम व लाल रंगाचा द्रव पदार्थ आहे. त्यातील प्रत्येक अनु, रेणू, हे प्रोटान, इलेकट्रान, न्युट्रान अशा या चुंबकीय शक्तींनी बनलेले आहेत. ही शक्ती त्याला गतीशिलतेच्या गुणधर्मापासून मिळाली आहे. त्यापासून सूर्य १५ प्रकारची विविध किरणे, तरंग बाहेर सोडतो. त्यापैकी पृथ्वीवर ८ रंगाची किरणे दिसत नाही पण सात रंगाची दिसतात. ती ८ मिनटात पृथ्वीवर ६५ लाख किलोमीटर अंतर कापून येतात, पृथ्वी ४.६ कोटी वर्षाआधी सूर्यापासून वेगळी झाली. तेव्हा ती सुद्धा गरम होती.

पृथ्वी सतत फिरत आहे अर्थात गतिशील आहे. हा गुणधर्म सुर्यानीच पृथ्वीला दिला. गतीशिलतेमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती माहित झाली दिवस-रात्र होते. दिवस म्हणजे सूर्याच्या प्रकाशात जाणे व रात्र म्हणजे सूर्यप्रकाशापासून वंचित होती, अंधारात जाणे. पृथ्वी म्हणजे पाणी आणि खनीजानांचे मिश्रण आहे. पृथ्वीवरील खनीजांचे अतिसूक्ष्म कन म्हणजे हवा, वायू होय. ती पृथ्वीपासून सुमारे १००० किलोमीटर दूर पर्यंत उडते. पृथ्वी पासून सुमारे १५-४० किमी अंतरावर ओझोन (वायू)चा स्थर असतो. तो सूर्याची घातक किरणे रोखतो. त्याला सध्या छिद्रे पडली म्हणून ती किरणे पृथ्वीवरील सजीवांवर विपरीत परिणाम करतात, त्यानेही प्राणी आजारी, रोगी होतात. तो “ईश्वरी कोप” नाही. आत्मा शरीरतातून आकाशात जातो म्हणजे कुठे, किती दूर असतो?

पृथ्वीवर १००० किलो मीटरच्या आत रसायन शास्त्राच्या भाषेत Xe, N2o, H2, CH4, He, Ne, CO2, Ar, O2, N2 ईत्यादी प्रमुख वायू असतात. पृथ्वीपासून १०-१२ किमी अंतरावर बाष्प असतो. तेवढ्याच अंतरावरून पृथ्वीवर पाउस येतो. पण तो देव पाठवतो म्हणून येतो असे नाही. ती एक भौतिक व भौगोलिक क्रिया आहे. देवाने सूर्य निर्माण केला नाही, चंद्रही बनवला नाही. त्यांना बनवतांना कोणी पाहिलेही नाही. पृथ्वीवर पाणी, जंगल, पहाडे ईश्वरांनी बनवले नाही.

पृथ्वीच्या गतिशील गुणधर्मांच्या परिणामाचा एक भाग आहेत. वायू म्हणजे अनेक भौतिक पदार्थाचे रूप तर पाणी म्हणजे दोन वायुंचे मिलन होय. प्राणवायु व हायड्रोजन वायुंचे मिश्रण म्हणजे पाणी होय. ते देवांनी बनवले नाही. देवाचे राज्य स्वर्गात आहे, ते आकाशात आहे म्हणजे पृथ्वीपासून दूर अंतरावर आहे? असा प्रचार चालू आहे. स्वर्गात देव हवा-पाणी वापरतात कि नाही? देव हवा घेतात; पाणी पितात कि नाही? देव हवा घेत असतील म्हणून त्यांना नाक आहे. पृथ्वी पासून दूरवर अर्थात हवेत स्वर्ग आहे म्हणजे किती किलोमीटर दूर आहे? हे स्वर्ग प्रेमी, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम लोकांनी व महायानी भिक्षुंनीही सिद्ध करून केले का?

देव स्वर्गात आहेत तर “ओझोन” वायूचे गड्डे बुझवण्याचे कार्य ते का करीत नाही? ओझोन म्हणजे ‘ओ३’, प्राणवायूचे ३ संयुगे. सूर्यकिरण व प्राणवायूच्या संयोगातून, मिलनातून ओझोन वायूची निर्मिती होते. सूर्य किरण सूर्य देतोच, पण वृक्षतोडीतून प्राणवायू बनविणे बंद होत आहे. झाडे पृथ्वीवर लावल्याशिवाय प्राणवायू बनणार नाही म्हणजे घातक सूर्य किरणांना रोखणारा ओझोन वायू निर्मितीस पृथ्वीवरील मानव प्रयत्न करू शकतो. स्वर्गात कोणत्याही काल्पनिक, अवैज्ञानिक देव नाही व स्वर्ग ही नाही माणूस मरतो व आत्मा देवाच्या राज्यात, स्वर्गात जातो. त्याला नेण्यासाठी “यमदूत” (देवाचा दूत) येतो. ही हिंदू धर्मातील कल्पना महायानी भिक्षूंनी त्रिपिटकात उतरवली. त्याला सम्राट अशोक राजा सुद्धा बळी पडले. स्वर्गीय सुखासाठी त्यांनी “सर्वधर्मसमभावी” धोरण लागू केले होते. कारण त्यांना मेल्यानंतरही सुख हवे होते.

मानवांना जन्म देव नाही तर आई-वडील घालतात. म्हणून आर्य-वडिलांना देव माना असा काहींचा समज बनला, पण तो चुकीचा आहे, कारण तो देव पूजेला खतपाणी घालतो, भक्तीभाव निर्माण करतो. भक्तीभावात अंध:श्रद्धा असते, विज्ञान नसते. प्रेम हवे पण भक्ती नको. झाडे जमिनीतून क्षार, प्रथिने, जीवनसत्व व पाणी शोषून स्वत:चे अन्न तयार करतात. प्राणीही ते खातात व जगतात. शेवटी मरतात. त्यावर सूक्ष्मजीव वाढतात. त्यांच्यापासून जीवाणू निर्माण होतात. ते जमिनीत मुरतात. झाडे त्यांना मुळाद्वारे शोषुण घेतात. म्हणजे “क्षार” (मिनरल) हे विविध जीवात-निर्जीवात बदलत असतात. क्षारांअभावी जीवन रोगी होते, निरोगी जीवनासाठी व्यक्तीला पुरेसे क्षार, जीवनसत्व, पाणी, उष्णता व शुद्ध हवा म्हणजे मुबलक प्राणवायू हवा कि, ईश्वरी आशीर्वाद?. मानवी जीवनासाठी सूर्याची फार इन्फ्रारेड नावाची किरणे हवीत (४ ते १६ मायक्राण) हवीत, ते सुद्धा जर खंडित, अपूर्ण वा अशुद्ध स्वरुपात मिळाली तर विविध आजार होतात. हा ईश्वरी कोप म्हणायचा का?

मानवी शरीराला दैनंदिन जीवनात जवळपास ८३ प्रकारचे क्षार (मिनरल) जरुरीचे आहेत. क्षाराशिवाय प्रथिने, प्रोटीन व जीवनसत्व कोणतेही कार्य करू शकत नाही. शरीर एकदाचे जीवनसत्व बनवू शकेल पण क्षार नाहीत. म्हणून भरपूर जीवनसत्व आहारात घेवूनही काही आजार ऐकत नाही. त्याचे कारण ईश्वरी कोप नव्हे वा ईश्वरी आशीर्वादाचा अभाव नसून पर्याप्त “क्षार” वा योग्य त्या पदार्थाचा तुटवडा होय. जे आजार जीवनसत्वाने जात नाही शुद्ध हवा, पाणी व सूर्य किरण घेवूनही जात नाहीत ते “योग्य” त्या क्षारांच्या पुरवठ्याने जातात हे विज्ञानाने आता सिद्ध करून दाखविले आहे. असे असतांना महायानी “बौद्ध पूजापाठ” व त्यातून भिक्षुंचा आशीर्वाद कशाला हवा? आशीर्वादानेच जगाची पुनर्रचना करण्याचे कार्य बुद्धाने का केले नाही? बुद्ध विहारात थांबले ते वर्षावासाठी, पुजापाठासाठी नाही. आजचे बुद्धविहारे म्हणजे परित्राणसूत्र पाठाचे, पूजांचे देवस्थान बनले आहेत. तिथे विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टी आहे का?